महादेव जानकर यांनी दिला स्वबळाचा नारा | जतसह राज्यात रासपचा मोठा प्रभाव

0
26

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महायुतीची साथ देणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी बुधवारी महायुतीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. तसेच विधानसभा निवडणुकीत पक्ष राज्यात स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले.

आपल्याशी महायुती किंवा महाविकास आघाडीने संपर्क साधला नसून आपण आपल्या पक्षाच्या वाढीसाठी हा निर्णय घेतला आहे. आपला पक्ष राज्यात सर्व जागा स्वबळावर लढणार असल्याचे जानकर यांनी सांगितले.
लोकसभेला महायुतीने आम्हालाएक जागा दिली होती; पण आमचा पक्ष मोठा झाला पाहिजे, आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, यासाठी आम्ही तयारी करत आहोत. राज्यातील २०० मतदारसंघांमध्ये प्रत्येक जागेसाठी तीन-तीन अर्ज आले आहेत. आता फक्त ८८ जागा राहिल्या आहेत. काही ठिकाणी आम्ही विजयी होऊ, काही ठिकाणी दोन नंबरची मते घेऊ. काही ठिकाणी १० हजारांपेक्षा जास्त मते घेऊ, असा दावा जानकरांनी केला आहे.
विधानसभेला आपल्या पक्षाला ४० ते ५० जागा मिळाव्यात, अशी मागणी त्यांनी महायुतीकडे केली होती; पण अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळेच महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here