मागेल त्याला सौर कृषीपंप; किती शेतकऱ्यांचा अर्ज?

0
16

शेतकऱ्यांना शेतीसाठी हक्काची, शाश्वत व स्वतंत्र वीज उपलब्ध करण्यासाठी शासनाने ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ योजना सुरू केली आहे. या योजनेला राज्यासह सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडूनही प्रतिसाद वाढू लागला आहे. महावितरणने राज्यात सहा महिन्यांत पन्नास हजार कृषी पंप बसविण्याचा टप्पा ओलांडला असून, यात सातारा जिल्ह्यातील ३६६ शेतकऱ्यांना समावेश आहे.

अखंडित वीज, लोडशेडिंग नाही, वीजबिल नाही, दुरुस्तीची हमी, विमा आदींमुळे ही योजना शेतकऱ्यांना लाभदायी ठरू लागली आहे. त्यामुळे ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजना शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहे.मागेल त्याला सौर कृषी और कृषी पंप योजनेत सर्वसाधारण शेतकऱ्याना दहा टक्के तर अनुसूचित जाती-जमातींच्या शेतकऱ्यांना पाच टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो. उर्वरित रक्कम केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान म्हणून मिळते. दिवसा वीजपुरवठा आणि लोडशेडिंग किंवा बिलाची चिता नाही, असे सौर कृषी पंपांचे वैशिष्ट्य आहे.
काय आहे मागेल त्याला सौर कृषीपंप योजना?
• शेतकऱ्यांना शेतीसाठी अखंडित वीज उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने ही योजना सुरू केली आहे.• या योजनेत शेतकऱ्यांना जमिनीच्या क्षेत्रफळानुसार तीन ते साडेसात एचपीपर्यंतचे पंप मंजूर होतात.• शेतकरी पारंपरिक ग्रीडमधून मिळणाऱ्या वीजपुरवठ्यावर अवलंबून राहत नाही. त्याला बिलही येत नाही.• सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांच्या सोयीचे ठरते
सौर कृषीपंप योजनेचे निकष काय?
अडीच एकरांपर्यंत तीन अश्वशक्ती, अडीच ते पाच एकरांपर्यंत पाच अश्वशक्ती तर पाच एकरांवरील शेतकऱ्यांना साडेसात अश्वशक्ती क्षमतेच्या कृषी पंपाचा लाभ घेता येतो. वैयक्तिक किवा सामुदायिक शेततळे, विहीर, बोअरवेल असल्यास त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. अटल सौर कृषी पंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ न घेतलेले शेतकरीही या योजनेस पात्र ठरतील.
शासनाकडून अनुदान
मागेल त्याला सौर कृषी और कृषी पंप योजनेत सर्वसाधारण शेतकऱ्याना दहा टक्के तर अनुसूचित जाती-जमातींच्या शेतकऱ्यांना पाच टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो. उर्वरित रक्कम केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान म्हणून मिळते. दिवसा वीजपुरवठा आणि लोडशेडिंग किंवा बिलाची चिता नाही, असे सौर कृषी पंपांचे वैशिष्ट्य आहे.
कसा कराल ऑनलाइन अर्ज?
महावितरणने मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा अर्ज,करण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध केली आहे. महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर शेतकऱ्यांना नोंदणी करता येते.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here