दिड हजाराची लाच महागात,अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

0
15
बिगर शेती जागेची नोंद घेऊन मालमत्ता उतारा देण्यासाठी १५०० रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी माळशिरस नगरपंचायतीमधील कर निर्धारण अधिकारी विकास गोरख पवार (वय ३८) यांना अॅन्टी करप्शनच्या पथकाने धाड टाकून ताब्यात घेतले. या प्रकरणी माळशिरस पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.
पडताळणी करून बुधवारी माळशिरस नगरपंचायतीच्या कार्यालयात ही कारवाई झाली. यातील तक्रारदाराने खरेदी केलेल्या बिगरशेतीच्या जागेची नोंद घेऊन त्यांना देण्यासाठी मालमत्ता उतारा माळशिरस नगरपंचायतीतील कर निर्धारण अधिकारी विकास पवार यांनी शासकीय फी व घरपट्टीचे २७८० व्यतिरिक्त १५०० रुपये लाच रक्कम असे एकूण ४,२८० रुपयांची मागणी केली.तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडे तक्रार केल्यानंतर बुधवारी (१६ ऑक्टोबर) पथकाने या तक्रारीची पडताळणी केली. नगरपंचायत कार्यालयात सापळा लावून १५०० रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. पोलिस उपअधीक्षक गणेश कुंभार यांनी माळशिरस पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम ७ प्रमाणे गुन्हा नोंदला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक शीतल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक गणेश कुंभार, सहा. फौजदार कोळी, हवालदार सोनवणे, घुगे, गायकवाड यांनी केली.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here