सांगली: विवाहानंतर कौटुंबिक कारणावरून सतत शिवीगाळ आणि मारहाण करून छळ केल्याप्रकरणी स्वाती किरण टारे या विवाहितेने सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पती किरण कुंथिनाथ टारे (वय ३०, रा. नांदणी, ता. शिरोळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मिरज तालुक्यातील इनाम धामणी येथील स्वाती यांचा २०१३ मध्ये नांदणी येथील किरण टारे याच्याशी विवाह झाला आहे. लग्नात साहित्य व्यवस्थित दिले नाही, उगीचच तुला माझ्या गळ्यात मारले आहे, असे बोलून पती किरण याने सतत छळ केला आहे.