सांगली-मिरजेतील कॅफेत पुन्हा एका युवतीवर लैंगिक अत्याचार | संशयित तरुणास अटक : ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल

0
34
सांगली : महाविद्यालयीन युवतीस फोटो ‘व्हायरल’ करण्याची धमकी देऊन सांगली आणि मिरजेतील कॅफेमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. युवतीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित अरिहंत संजय छंचुरे (वय १९, रा. बजरंगनगर कुपवाड) याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचार आणि सुधारित बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पीडित युवती ही महाविद्यालयात शिक्षण घेते.
अरिहंत याने तिच्याशी ओळख वाढवून मैत्री केली. दोघेजण एकमेकाला भेटू लागले. अरिहंत याने तिला ‘कॅफे’मध्ये नेले तिच्यासोबत काही फोटो काढले. त्यानंतर फोटो ‘व्हायरल’ करण्याची धमकी देत दि. २० नोव्हेंबर २०२३ पासून सांगलीतील कॅफे डिलाईट आणि मिरजेतील कॅफे सन राईज वेळोवेळी तिला बोलवले. तेथे तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. दि. १६ ऑक्टोबर रोजी अरिहंत याने सोशल मीडियावरून पीडिताचे फोटो सर्वांना दिसेल अशा पद्धतीने ‘स्टोरी’इन्स्टाग्रामवर ‘व्हायरल’ केली पीडितेस हा प्रकार समजताच तिने विश्रामबाग पोलिस ठाण्यात धावा घेऊन फिर्याद दिली. अरिहंत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्याला पोलिसांनी संशयिताला त्वरित अटक केली आहे.
प्रकरणात कॅफेचालक होणार सहआरोपी
कॅफेमधील अत्याचारप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी चालकास सहआरोपी केले होते. त्यानंतर दुसऱ्या गुन्ह्यात सहआरोपी करण्याची मागणी केली. आता तिसऱ्यांदा सांगली-मिरजेतील कॅफेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.त्यामुळे यातही चालकास सहआरोपी केले जाण्याची शक्यता आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here