अबब…जूगार अड्ड़्यावरील छाप्यात ५० लाखांचा मुद्देमाल जप्त | सांगली जिल्ह्यातील उमदीत सर्वात मोठी कारवाई

0
570

सांगली : कर्नाटक व महाराष्ट्र सीमावर्ती असणाऱ्या जत तालुक्यातील कोंतेबोबलाद येथील सर्वात मोठ्या जुगार अड्ड्यावर पोलीसांनी छापा ताकत तब्बल ५० लाखाहून जास्त रक्कमेचा मुद्देमाल जप्त केला आहे.जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वात मोठी कारवाई आहे.कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष

पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी सांगलीचे पोलिस अधीक्षक संदीप
घुगे यांना स्वतः कारवाई करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार कोंतेबोबलाद येथील अंतरराष्ट्रीय जूगार अड्ड्यावर रविवारी  टाकलेल्या छाप्यात तब्बल २० लाखांची रोकड तसेच ४२ मोबाईल, कार, दुचाकी असा तब्बल ५० लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याप्रकरणी जुगार अड्ड्याचे मालक, चालक यांच्यासह ४१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या छाप्यानंतर उमदी पोलिस ठाण्याच्या प्रभारींना हटवण्याचे संकेत महानिरीक्षक फुलारी यांनी ‘माध्यमा’शी बोलताना दिले आहेत.
सांगली, सोलापूर जिल्ह्यातील तसेच कर्नाटकातील काहींनी मिळून सीमाभागात असलेल्या कोंतेबोबलाद येथे आंतरराष्ट्रीय जुगार अड्डा सुरू केला होता. या जुगार अड्ड्यावर महाराष्ट्रासह कर्नाटकातील जुगारी येत होते.दररोज लाखो रूपयांची उलाढाल होत असल्याची माहिती महानिरीक्षक श्री.फुलारी यांना खबऱ्याद्वारे मिळाली होती. त्यानंतर त्यांनी या जुगार अड्ड्यावर अधीक्षक घुगे यांना स्वतः कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अधीक्षक घुगे यांच्या नेतृत्वात जतचे उपअधीक्षक सुनील साळुंखे तसेच अन्य अधिकारी,अंमलदारांचे एक विशेष पथक तयार केले होते. रविवारी या पथकाने कोंतेबोबलाद येथे छापा टाकण्यात आला.यात जुगाऱ्यांसह अड्ड्याचे चालक, मालक यांना ताब्यात घेतले.या छाप्यात २० लाखांची रोकड, ४२ मोबाईल, तीन कार, दोन दुचाकी, जुगाराचे
साहित्य असा एकूण ५० लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी सांगली, सोलापूर आणि कर्नाटकातील एकूण ४१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी जुगार अड्डा चालवणारे मेहबूब गोल्डन, मुन्ना बागवान, सादिक इनामदार (रा.विजयपूर), संतोष बजंत्री (बेळोंडगी),संदीप चौगुले (जयसिंगपूर) यांच्यासह विजयपूर येथील २१, सोलापूर येथील ३, बेळंडगी येथील २, उमदीतील १, कर्नाटकातील अन्य गावांतील १४ अशा ४५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमदी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना हटवणार
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमा भागातील अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असतानाही उमदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सवार्त मोठा जुगार अड्डा सुरू असल्याचे‌ समोर आले आहे.विशेष म्हणजे थेट विशेष महानिरीक्षक सुनिल फुलारी यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी थेट अधीक्षक घुगे यांनाच कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत इतका मोठा जुगार अड्डा सुरू असूनही त्याला अभय‌ दिल्याचे समोर आल्यामुळे उमदी पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना हटवण्याचे संकेत महानिरीक्षक श्री. फुलारी यांनी दिले आहेत.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here