जिल्ह्यात पाच जणांचे अर्ज दाखल आमदारांसह
गुरुपुष्यामृताचा मुहूर्तामुळे आज मोठ्या संख्येने उमेदवारी अर्जुन दाखल होणार
सांगली जिल्ह्यातील आठही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पुन्हा उतरण्याची तयारी केलेल्या जिल्ह्यातील काही विद्यमान आमदारांसह दिग्गज नेत्यांकडून गुरुवारी गुरुपुष्यामृतच्या मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. काही नेत्यांनी दिवाळीतील धनत्रयोदशीला म्हणजेच २९ ऑक्टोबरला, तर काहींनी २८ ऑक्टोबरला एकादशीच्या मुहूर्तावर अर्ज भरण्याचे नियोजन केले आहे.
सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातून चार अपक्षांसह पाच जणांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर ४० जणांनी ६९ अर्जाची खरेदी केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना मुहूर्तांना अधिक पसंती दिली जात आहे. अनेक विद्यमान चार आमदारांसह इच्छुक असलेल्या बड्या नेत्यांकडून गुरुवारी मुहूर्तावर अर्ज दाखल केले जाणार आहेत. उर्वरित आमदार व काही नेत्यांकडून एकादशी व धनत्रयोदशीला अर्ज दाखल होणार आहेत.जातील. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत येत्या २९ आक्टोबरला आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशीही अर्ज दाखल होऊ शकतात. जिल्ह्यातील अनेक मतदारसंघांत विविध पक्षांचे उमेदवार निश्चित झालेले नाहीत.
त्यामुळे उमेदवारी अर्जाचे घोडेही अडले आहे. येत्या दोन दिवसांत उमेदवारी निश्चितीनंतर मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होऊ शकतात. काही मतदारसंघांत जागा कोणत्या पक्षाला जाणार हेसुद्धा निश्चित नाही. मिरज, खानापूर मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित नाही. इस्लामपूर, शिराळा, पलूस-कडेगाव, जत याठिकाणी महायुतीचे उमेदवार निश्चित झालेले नाहीत. त्यामुळे येथील महायुतीचे उमेदवारी अर्ज शेवटच्या दोन दिवसांत दाखल होऊ शकतात.
जतेत १७ अर्जाची विक्री, दोन अर्ज दाखल
जत विधानसभा मतदारसंघांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी नऊ उमेदवारांनी १७ अर्ज नेले आहेत. विक्रम ढोणे व बिळूर येथील सतीश कदम या दोघांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. जत विधानसभेसाठी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी नऊ उमेदवारांनी २७ अर्ज घेतले आहेत. दोन दिवसांत २१ इच्छुकांनी ४० अर्ज घेतले आहेत. दुसऱ्या दिवशी आमदार गोपीचंद पडळकर,चंद्रकांत गुड्डोडगी,प्रा.राजेंद्र कोळेकर,सुरेश शिंदे, रवींद्र सोलनकर, आदी प्रमुखांनी अर्ज घेतले आहेत. दरम्यान, गुरुवारी गुरुपुष्यामृत योग असल्याने प्रमुख उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. यात आमदार विक्रमसिंह सावंत हे शक्तिप्रदर्शनाने अर्ज भरतील. प्रकाश जमदाडे, तम्मनगौंडा रविपाटील, शंकर वगरे, प्रा. राजेंद्र कोळेकर यांचेही अर्ज दाखल होणार आहेत.
आ.सावंत अर्जुन शक्तीप्रदर्शनाने अर्ज भरणार
जतमध्ये विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत हे आज गुरुपुष्यामृताचा मुहूर्त साधत मोठ्या शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.त्याचबरोबर अन्य नेत्यांचेही मुहूर्त साधत अर्ज दाखल होतील.
रोहित पाटील आज उमेदवारी अर्ज भरणार
तासगाव : तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून युवा नेते रोहित पाटील उद्या (गुरुवार) आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तासगाव शहरातून पदयात्रा काढून तहसील कार्यालयासमोर त्यांची सभा होणार आहे. पदयात्रा व सभेच्या माध्यमातून ते शक्तीप्रदर्शन करणार आहेत. दरम्यान, तासगाव कवठेमहांकाळचे मैदान मारण्यासाठी रोहित पाटील समर्थक पूर्ण ताकतीने मैदानात उतरले आहेत.