सांगली : तासगाव तालुक्यातील एका विवाहितेस कोल्डिंगमधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर सांगलीत अत्याचार केला. त्याचप्रमाणे ती बेशुद्धावस्थेत असताना तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केले. हा प्रकार कोणाला सांगितल्यास पती आणि मुलाला ठार मारण्याची धमकी संशयितांनी तिला दिली होती. पीडितेस हुबळीला घेऊन जात असताना तिने प्रसंगावधान राखत मिरजेला चारचाकीतून पळ काढल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी तिघांवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. फजल पटेल (वय ३६, रा. पाकिजा मस्जिद शेजारी, सांगली), अल्ताफ करीम (वय ३५) आणि फजलचा भाऊ अल्फाज (पूर्ण नाव नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अत्याचाराची घटना मार्च २०२४ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत घडली. याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात पीडितेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, पीडित तिची ओळख संशयित फजल पटेल याच्याशी झाली होती. फजल याने तो राहत असलेल्या घरी पीडितेला बोलावून घेतले. याठिकाणी कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकून ते तिला पिण्यास दिले. ती बेशुद्ध झाल्यानंतर संशयिताने तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ काढले. अतिप्रसंग केल्याबद्दल पीडितेने जाब विचारला असता फजल पटेल याने चाकूचा धाक दाखवत हा प्रकार कोणाला सांगितल्यास पती आणि मुलाला ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर संशयिताने करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. मागील महिन्यात संशयितांनी जबदरस्तीने चारचाकीत बसवले. यावेळी गाडीत फजल याचा भाऊ अल्फाज, त्याचा मित्र अल्ताफ करीम हे होते. यावेळी संशयितांनी पीडितेला हुबळीला नेऊन विकूया, असे अन्य दोघांना सांगितले, मिरजेत गाडी आल्यावर पीडितेने तेथून शिताफीने पलायन केले. पीडितेने थेट पोलीस ठाणे गातून तिघांविरोधात फिर्याद दिली. संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.