जतमध्ये पाण्याचे राजकारण, म्हैसाळ योजना,भूमिपुत्र मुद्दे गाजणार | आ.पडळकर यांच्या उमेदवारीमुळे लक्षवेधी लढत होणार !

0
262

जत विधानसभा मतदारसंघात यंदाही लक्षवेधी लढत होणार आहे, काँग्रेस, भाजप व तिसरी आघाडी यामध्ये प्रामुख्याने तिरंगी लढत होणार आहे. राजकीय वातावरण तापले आहे. भूमिपुत्र, विस्तारित म्हैसाळ योजना या मुद्द्यावर निवडणुकीचा फड रंगणार आहे.

आमदार विक्रमसिंह सावंत यांना काँग्रेसने दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. दुष्काळ, विस्तारित म्हैसाळ योजना, पाणीप्रश्न व विकासाचे प्रश्न यावर सातत्याने चर्चा झाली आहे. परंतु, ते प्रश्न सुटले नाहीत. सावंत यांच्याविरोधात भाजपकडून आमदार गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यामुळे भाजपमधील नाराज गटाच्या भूमिककडे लक्ष लागले आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून जनसंपर्कची मोर्चेबांधणी दोन्हीकडून सुरू आहे.या प्रश्नांवर होणार चर्चा

एजत शहराच्या ७८ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेवरून सावंत व पडळकर यांच्यात श्रेयवाद रंगला आहे. उमदी येथे पंचतारांकित एमआयडीसी मंजुरी देऊन सक्षम उद्योग उभे करण्याचे दोन्ही नेत्यांनी आश्वासन दिले आहे. मात्र, ही मंजुरी केवळ निवडणुकीत मतदारावर प्रभाव टाकण्यासाठी काढलेला फतवा आहे का? हे जनतेला सांगताना नेत्यांची दमछाक होत आहे. शिवाय या मतदारसंघात

जातीचे समीकरण मांडले जात आहे.तर तिसऱ्या आघाडीची शक्यता…

माजी सभापती तम्मनगौंडा रवि-पाटील यांनी भाजप, अपक्ष असे दोन अर्ज शुक्रवारी भरले आहेत. पक्षाकडून उमेदवारी नाही मिळाली तरीसुद्धा अपक्ष लढवायचीच भूमिका घेतली आहे. जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनीही अर्ज दाखल केला आहे. माजी आमदार विलासराव जगताप, तम्मनगौंडा रवि- पाटील, प्रकाश जमदाडे, भाजप युवा नेते शंकर वगरे, उद्योगपती राजेंद्र कोळेकर यांनी बैठक घेऊन भूमिपुत्राच्या मुद्द्यावर जनतेमध्ये भावनिक वातावरण केले आहे

त्यामुळे भूमिपुत्र प्रचाराचा कळीचा मुद्दा ठरणार आहे. स्थानिकाला उमेदवारी नाही मिळाली, तर सर्वांनी तिसरी आघाडीची घोषणा केली आहे

स्थानिक विरुद्ध उपरा संघर्ष

भाजपकडून आमदार गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. सोशल मीडियावर स्थानिक विरुद्ध उपरा अशी टॅगलाईन टाकून चर्चा घडवून आणली जात आहे. आमदार टी. के. शेंडगे (१९६२ – पेड, ता. तासगाव), आमदार जयंत सोहनी (१९८० – गोमेवाडी, ता. आटपाडी), आमदार सुरेश खाडे (२००४ – पेड, ता. तासगाव), आमदार प्रकाश शेंडगे (२००९ – करेवाडी ता. कवठेमहांकाळ) असे चार आमदारांनी २० वर्षे जतचे नेतृत्व केले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here