जत : जतमध्ये स्थानिक नेत्याचा विरोध डावलून आमदार गोपीचंद पडळकर यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे.त्यामुळे जत तालुक्यातील भाजपाच्या नाराज नेत्यांनी बंड करत अखेर तिसरी आघाडी निर्माण करत तम्मणगौडा रवीपाटील यांना मैदानात उतरवले आहे.
गेली दोन वर्षे रवीपाटील विधासभेची तयारी करत होते.त्यामुळे त्यांना उमेदवारी भाजपाने द्यायला पाहिजे होती.मात्र त्यांना डावलल्याने आम्ही त्यांना अपक्ष निवडणूक रिंगणात उतविले आहे.त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून तालुक्याची ताकत दाखवावी, असे आवाहन विलासराव जगताप यांनी सांगितले.
जत येथे भाजपाच्या नाराज गटाचा मेळावा झाला त्यात एकमताने तम्मणगौडा रवीपाटील यांच्या विजयासाठी प्रयत्न करण्याचे ठरले आहे.