मिरज,खानापूरचा तिढा सुटला | उद्धवसेनेकडून तानाजी सातपुते,खानापुरात शरद पवार गटाकडून वैभव पाटील

0
145

महाविकास आघाडीअंतर्गत मिरजेच्या जागावाटपाचा संभ्रम रविवारी दूर झाला. याठिकाणी उद्धवसेनेने तानाजी सातपुते यांना उमेदवारी जाहीर केली. दरम्यान, खानापूर-आटपाडी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने अॅड. वैभव पाटील यांना उमेदवारी जाहीर केली.महाविकास आघाडीच्या जागा वाटपात मिरज मतदारसंघ उद्धवसेनेला, तर खानापूर शरद पवार गटाला मिळाला.

सांगलीत काँग्रेसमध्ये जयश्रीताईंची बंडखोरी निश्चित झाली आहे.सांगलीत रविवारी जयश्रीताई पाटील यांनी त्यांच्या गटाची बैठक घेत बंडखोरी जाहीर केली. सोमवारी, २८ ऑक्टोबरला त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे काँग्रेसची या मतदारसंघातील डोकेदुखी वाढणार आहे. या मतदारसंघात काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

महाडिक गटाचे शिराळ्यात बंड केले असून इस्लामपूरातही त्याचे पडसाद उमटले आहेत.शिराळा मतदारसंघात भाजपने सत्यजित देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाराज झालेल्या महाडिक गटाने बैठक व मेळावा घेत बंडखोरीचे निशाण फडकाविले. त्यामुळे भाजपमध्ये आता दोन गट पडले आहेत.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here