मला अटक करून दाखवाच,आवाहन देणाऱ्या खुनी हल्ल्यामधील फरारीस अटक

0
145

खुनी हल्ल्यातील फरार संशयित अभिषेक सुकुमार उपाध्ये (रा. कुंडल, सध्या रा. पिंपरी चिंचवड, पुणे) याला पलूस पोलिसांनी नऊ महिन्यांनंतर अटक केली. सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली.

फिर्यादी तेजस सुखदेव मासाळ (वय २६, रा. अहिल्यानगर कुंडल) हा महाराष्ट्र स्टील कंपनीत खासगी नोकरी करत होता. गावातीच युवतीशी त्याने दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला. युवतीच्या कुटुंबाचा विरोध झुगारून तेजस व प्रसिद्धी हिने प्रेमविवाह केला. याचाच राग मनात धरून तिचे चुलते अशोक लाड व सहकारी दिग्विजय लाड यांच्या मदतीने अभिषेक सुकुमार उपाध्ये याला तेजसला जिवे मारण्याची एक लाख ६५ हजार रुपयांची सुपारी दिली होती.

तेजस कामावर गेला असता २७ जानेवारी रोजी अभिषेक व त्याच्या एका साथीदाराने महाराष्ट्र स्टीलजवळ अडवून तेजस याच्या डोक्यात, पायावर मारून गंभीर जखमी केले. जखमी तेजसला सोडून हल्लेखोर फरार झाले. खुनी हल्ला प्रकरणी दिग्विजय लाड, प्रतीक गायकवाड, अशोक लाड यांना यापूर्वीच अटक केली होती. मात्र, मुख्य हल्लेखोर अभिषेक उपाध्ये हा फरार होता. तो अनेक दिवस पोलिसांना चकवा देत फिरत होता. दोन दिवसांपूर्वी तो पिंपरी चिंचवड येथे राहत असल्याची माहिती पलूस पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून अटक केली.पोलिसांना दिले होते आव्हान फरार अभिषेकने पोलिस यंत्रणेला आव्हान केले होते. मला अटक करून दाखवाच असे तो म्हणत होता. चार महिन्यांपूर्वी पदभार स्वीकारलेले सहायक निरीक्षक सुशांत पाटील यांनी आव्हान स्वीकारले. तत्काळ अभिषेकला जेरबंद केले

.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here