पुर्व भागात आमदार विक्रमसिंह सावंत यांना आता मोठी ताकत मिळाली आहे. संखचे सरपंच सुभाष पाटील यांनी अखेर आमदार विक्रमसिंह सावंत यांना पांठिबा दिला आहे.जनसुराज्यचे नेते बसवराज पाटील यांचे चिंरजिव असलेले सुभाष पाटील राष्ट्रवादी कॉग्रेस(श.प.)गटामध्ये सक्रीय होते.गेली काही दिवस त्यांनी विधानसभेबाबत आपला निर्णय केला नसल्याने संभ्रम होता.
मात्र काल गुरूवारी सायकांळी त्यांच्या महाविद्यालयाच्या मैदानात आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी बैठक झाली.यावेळी खा.विशाल पाटील हेही उपस्थित होते.येथे सर्वानुमते आमदार विक्रमसिंह सावंत यांना पांठिबा देण्याचा निर्णय झाला.
यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले,संख गावाला आतापर्यंत कोट्यावधीचा निधी देऊन तेथे प्राथमिक आरोग्य केंद्र, जलसंधारण महामंडळ, चेकडॅम,रस्ते काँक्रीटीकरण व शेत बंधारा बांधणे.अशी अनेक विकासकामे आपल्या निधी मार्फत झाली आहेत.आगामी काळात देखील हा विकासाचा रथ असाच निरंतर चालू ठेवायचा आहे त्यासाठी पुन्हा एकदा निवडून देण्याची विनंती मतदार आ.सावंत यांनी केली. यावेळी गावकऱ्यांच्या वतीने आपुलकीने स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब कोडग,मारूती पवार,साहेबराव टोणे,मैनुद्दीन जमादार व ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.