गेल्या पाच वर्षातील विकास कामामुळे,मिळणारा प्रतिसाद यामुळे पुन्हा विजय निश्चित आहे.गुलगुंजनाळ, तिकोंडी, करेवाडी, पांडोझरी, पारधेवस्ती, खंडनाळ, व दरीबडची या गावांना भेट देऊन तेथील नागरिकांशी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी संवाद साधला.जत तालुक्यातील जनतेने मला आशीर्वाद दिला नसता, तर मी कधीच आमदार झालो नसतो. तुमच्या पाठिंब्यामुळेच इतकी विकासकामे पूर्ण करता आली.तुमच्यामुळे तालुक्याचा चेहरा-मोहरा बदलण्याची संधी मिळाली हे माझे खरे भाग्य आहे.
आणि याच विश्वासाच्या आधारावर मी पुन्हा आपल्याकडे मत मागण्यासाठी आलो आहे.आजच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे विजय अटळ आहे, याचा आत्मविश्वास वाढला आहे,असे यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी म्हटले.यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, महाविकास आघाडीचे नेते, आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.