जत: जत विधानसभा निवडणूकीत आता तिंरगी लढत निश्चित झाली असून भाजपाचे भूमिपुत्र इच्छुक उमेदवार तम्मणगौडा रवीपाटील यांनी बंडखोरी केली आहे.ते अपक्ष लढणार आहे,त्यांना टेबल हे चिन्ह मिळाले आहे.
गेल्या चार-पाच वर्षापासून ते विधानसभेची तयारी करत होते.पक्षाने त्यांना डावलून आमदार गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली आहे.त्यामुळे तम्मणगौडा रवीपाटील हे अपक्ष लढणार हे निश्चित झाले होते.आज त्यांनी अर्ज माघार घ्यावी म्हणून गृहमंत्री अमित शाह यांनीही रवीपाटील यांना संपर्क केला होता.मात्र त्यांनी अर्ज माघार घेण्यास नकार दिल्याने तिंरगी लढत निश्चित झाली आहे.
आता जतमध्ये महाविकास आघाडीकडून आमदार विक्रमसिंह सावंत,महायुतीकडून आमदार गोपीचंद पडळकर व अपक्ष म्हणून तम्मणगौडा रवीपाटील असा तिंरगी तुल्यबळ सामना होणार आहे.आज दिवसभर रवीपाटील यांना माघार घेण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडून प्रयत्न झाले.
दरम्यान त्यांनी अर्ज ठेवल्याने भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.गतवेळीही अशाच पध्दतीने डॉ.रविंद्र आरळी यांनी बंडखोरी केल्याने त्यावेळचे विद्यमान आमदार विलासराव जगताप यांचा पराभव झाला होता.यंदाही तशीच परिस्थिती निर्माण झाली असून रवीपाटील बंड विजयात रूपातंर करतात का?,स्व:पक्षाच्या उमेदवाराला घातक ठरतात हे येणाऱ्या २३ तारखेला स्पष्ट होणार आहे.