सांगलीतून एक धक्कादायक घडली असून ऐन विधानसभा निवडणूक सुरू असतानाच सुधाकर खाडें या नेत्याची हत्या झाली आहे.या घटनेनंतर आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.खाडे हे मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष होते.तर सध्या ते भाजप(BJP)च्या उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आहेत.मिरज-पंढरपूर रस्त्यावर सुधाकर खाडे यांच्यावर हल्ला झाला आहे.
याबाबत पोलिस सुत्राकडून मिळालेली माहिती अशी,आज शनिवार सकाळी मिरज-पंढरपूर रस्त्यावर सुधाकर खाडे यांच्यावर हल्लेखोरांनी हल्ला झाला होता.यात खाडे गंभीर जखमी झाले होते.घटनेनंतर त्यांना उपचारासाठी तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले.
मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाकडून घोषित करण़्यात आले आहे.ऐन निवडणूकीच्या काळात अशी घटना घडल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.दरम्यान पोलीसांनी गयी ने तपास करत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.अन्य संशयितांचाही शोध सुरू आहे.