जत : आमदार गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देताना भूमिपुत्र,जातीचे राजकारण असे मुद्या मोठ्या चर्चेत आला होता.मात्र गेल्या चार दिवसात भूमिपुत्र व जातीचे राजकारण हे मुद्देच गायब झाले आहे.आमदार पडळकर यांना लोकांनी मोठी पंसती दिली आहे.
सध्या तालुक्यात भाजपाचे उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर यांना मिळणारा पाठींबा जात व भूमिपुत्राच्या चौकटी तोडून पुढे गेला आहे.आ.पडळकर यांनी अल्प कालावधीत अनेक गावे,जत शहर,धार्मिक स्थळांना कोट्यावधीचा विकास निधी दिला आहे.
त्यामुळे तालुक्यात सर्वाधिक प्रतिसाद आमदार गोपीचंद पडळकर यांना मिळत असून त्यांचा विजय पक्का असल्याचे मत जत पश्चिम भागाचे नेते दिग्विजय चव्हाण यांनी व्यक्त केले.
मुळात उमेदवारी मिळाल्यानंतर बंडखोरीचे पेव आले,त्यानंतर भूमिपुत्राचा मुद्दा जोर धरला.यातही काय भाजत नाही म्हटल्यावर आ पडळकराचे जातीचे राजकारण असा मुद्दा पुढे आणला मात्र गेल्या चार दिवसात आ पडळकर यांना सर्व जाती धर्मीयांचा पाठींबा मिळू लागल्याने सर्व मुद्दे गायब झाले आहेत.
जत पश्चिम भागात सध्या पडळकर नावाचे वादळ आले असून अनेक मोठे नेते,आजी-माजी पदाधिकारी,ग्रामपंचायत सदस्य,अनेक संघटनांनी बिनशर्त पाठींबा देत मोठे मताधिक्य देणार असल्याचे सांगितले.जत पश्चिम भागात सध्या आमदार गोपीचंद पडळकर याचे पारडे जड आहे.त्यांना या भागातून मोठे मताधिक्य देऊ,असेही दिग्विजय चव्हाण यांनी सांगितले.