तिंरगी लढतीत कसं आहे सांगोल्यातील गणित ..!

0
200

सांगोला : सांगोला विधानसभा मतदारसंघात शिंदेसेना, उद्धवसेनेसह – शेकाप उमेदवार यांच्यात हाय व्होल्टेज लढत होत आहे. काय झाडी, काय डोंगर फेम आ. शहाजीबापू पाटील हे सांगोल्यातून आठव्यांदा निवडणूक लढवीत आहेत, तर उद्धवसेनेचे दीपक आबा साळुंखे पाटील व शेकापचे डॉ. – बाबासाहेब देशमुख पहिल्यांदाच निवडणूक लढवीत आहेत. महाविकास आघाडीतून शेकाप आणि उद्धवसेना स्वतंत्र लढत असल्यामुळे निवडणूक तिरंगी होत आहे.

सांगोला मतदारसंघातून स्व. गणपतराव देशमुख यांनी एकच मतदारसंघ व एकाच पक्षातून ११ वेळा जिंकले. सन १९९५ व २०१९ ला शेकापच्या बालेकिल्लाला शहाजीबापू पाटील यांनी सुरुंग लावण्याचे काम केले. दीपक आबाच्या मदतीने आ. शहाजीबापूंनी स्व. गणपतआबांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांचा ७६८ मतांनी पराभव केला. यंदा शहाजीबापू पाटील हे महायुतीकडून, त्यांचे सहकारी राहिलेले दीपकआबांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देऊन उद्धवसेनेकडून, तर स्व. गणपत आबांचे दुसरे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यंदा शेकापतून नशीब आजामावीत आहेत. गणपतराव देशमुख अन् शहाजीबापू पाटील यांच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

मतदारसंघातील कळीचे मुद्दे

सांगोला तालुक्यात तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध होण्यासाठी मोठे उद्योगधंदे किंवा औद्योगिक वसाहत उभी न राहिल्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न आजही भेडसावत आहे

सांगोला तालुक्यात औद्योगिक वसाहत २ निर्माण होणे ही काळाची गरज आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल.डाळिंबाचे कोठार म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या सांगोल्यात डाळिंब संशोधन केंद्र होणे गरजेचे आहे.

सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने • सांगोल्यात उपविभागीय कार्यालय, आरटीओ कार्यालय व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय गरजेचे आहे.मेडिकल कॉलेज सुरू करून तालुक्यातील सर्व सामान्य घरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे.यासह अनेक मुद्यांभोवती सध्या ही निवडणूक फिरत असल्याचे दिसते.

२०१९ मध्ये काय घडले?

शहाजीबापू पाटील

शिवसेना (विजयी) ९९,४६४

डॉ. अनिकेत देशमुख शेकाप ९८,६९६

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here