सांगली जिल्ह्यात विधानसभेला उच्चांकी मतदान | रात्री 10 वाजेपर्यंत प्राप्त close of poll ची अंदाजित टक्केवारी समोर

0
504

सांगली : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी सांगली जिल्ह्यात शांततेत व सुव्यवस्थेत मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यात अंदाजे सरासरी 71.57 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.

           

ही टक्केवारी दि. 20 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजेपर्यंत प्राप्त close of poll ची अंदाजित टक्केवारी आहे. उद्या मतदानाची अंतिम आकडेवारी (end of poll) दिली जाईल. close of poll ची आकडेवारी अंदाजित असून, End of poll मधील मतदानाच्या अंतिम आकडेवारीमध्ये थोडाफार बदल होऊ शकतो.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी जिल्ह्यातील आठ मतदारसंघात दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत विधानसभा मतदारसंघनिहाय झालेल्या मतदानाची अंदाजित आकडेवारी पुढीलप्रमाणे. 281-मिरज – 64 टक्के, 282-सांगली – 63.11, 283-इस्लामपूर-74.51, 284-शिराळा-78.45, 285-पलूस-कडेगाव-79.02, 286-खानापूर-70.41, 287-तासगाव-कवठेमहांकाळ – 74.1 व 288 जत  विधानसभा मतदारसंघात 72 टक्के इतके अंदाजित मतदान झाले.

दरम्यान सकाळी 7 वाजल्यापासून मतदानास सुरूवात झाली. मतदारांनी उत्साहाने रांगा लावून मतदान केले. लोकशाहीच्या या उत्सवामध्ये नवमतदाराबरोबरच, नवदांपत्य, 100 वर्षावरील वृध्द, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथी, महिला आदिंनी आपला सहभाग नोंदवून मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.

जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 2 हजार 482 मतदार केंद्रांवर मतदान पार पडले. यापैकी 1 हजार 509 मतदान केंद्राचे वेबकास्टींग करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षातून वेबकास्टींग करण्यात आलेल्या केंद्रांवरील निवडणूक प्रक्रियेवर जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी बारकाईने नजर ठेवली होती.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here