आमदार गोपीचंद पडळकर जतचा चेहरामोहरा बदलतील | दिग्विजय चव्हाण | खऱ्या अर्थाने जतच्या विकासाला सुरूवात होणार

0
935

जत : विकासाचे व्हिजन,काम करण्याची स्व:ताचा वेगळा अंजेडा असणारे नेतृत्व असणारे आमदार गोपीचंद पडळकर हे जतचा पाच वर्षात ‌चेहरा-मोहरा बदलतील,यात शंका नाही,असे मत भाजपाचे विधानसभा संयोजक तथा भारतीय युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष दिग्विजय चव्हाण यांनी व्यक्त केले.

डफळापूर येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विजयाचा गुलालची उधळन,फटाक्याची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला.

दिग्विजय चव्हाण पुढे म्हणाले,भाजपच्या सर्व समावेशक विकासाच्या धोरणामुळे,विकासदुत नेतृत्व असणारे आमदार गोपीचंद पडळकर यांना जत पश्चिम भागातून मोठे मताधिक्य मिळविण्यात यश मिळाले आहे.जत तालुक्यातील जनतेने भाजपला मोठी साथ दिली आहे.विकासाचे व्हिजन असलेले उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर यांना तालुक्यातील जनतेची मिळालेली साथ हे त्यांचे जनतेविषयी तळमळीची पोचपावती आहे.

दिग्विजय चव्हाण पुढे म्हणाले,भाजपच्या विकासाच्या अजेंड्यामुळे आम्ही प्रभावित होऊन काँग्रेस मधून भाजपकडे आकर्षित झालो होतो.लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही प्रत्यक्षात भाजपच्या पक्ष कार्यात उतरलो लोकसभा निवडणुकीत भाजपची ध्येय धोरणे लोकांपर्यंत पोहोचवत मोठे मताधिक्य देण्यात यशस्वी झालो होतो. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर भाजपाचे जत विधानसभा मतदार संघाचे संयोजक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. 

भाजपकडून उमेदवारी मिळणाऱ्या उमेदवाराला आम्ही निवडणून आणण्याचे ठरविले होते.सुदैवाने भाजप नेतृत्वाने विकासाचे व्हिजन व विकासदूत असलेले तरुण उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली.त्यांना उमेदवारी मिळताच आम्ही पुन्हा जोमाने प्रचार यंत्र राबवली.जत पश्चिम भागात आमचे प्रभावक्षेत्र असलेल्या गावातील आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून आमदार गोपीचंद पडळकर यांना निवडून आणण्यात‌ योगदान दिले.त्यांचा विजय हा जनतेने पण दिलेला मोठा जनादेश आहे.

भाजपा किंबहुना आमदार पडळकर यांचे काम करण्याची पद्धत व जतच्या विकासाचे रोडमॅप तयार करून त्यांनी राबवलेले प्रचार यंत्रणा,त्याचबरोबर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी संघटन मजबूत करत मिळवलेला प्रतिसाद यामुळे आमदार गोपीचंद पडळकर यांचा प्रचंड मोठा विजय मिळाला आहे.तालुक्यात सर्वात प्रथम आम्ही गोपीचंद पडळकर हे निवडणूक लढवणार असल्याचे समजताच पाठिंबा दिला होता.आमदार पडळकर यांना निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही घेतली ती यशस्वीपणे पार पडली आहे.जत पश्चिम भागात डफळापूरसह बारा गावात आमदार पडळकर यांना आघाडी मिळाली आहे.विकासाचे व्हिजन कसे असते हे आमदार गोपीचंद पडळकर यांनी निवडणुकीआधीच जत तालुक्याला दाखवले आहे.त्यामुळे यापुढील पाच वर्षात जतचा झपाट्याने विकास झालेला दिसणार आहे.

आमदार पडळकर हे जतचे नाव राज्यात नंबरवर करतील हे निश्चित आहे,असे दिग्विजय चव्हाण म्हणाले.यावेळी अभिजीत चव्हाण,बाळासाहेब चव्हाण, तानाजी चव्हाण,रमेशभाऊ चव्हाण,भारत गायकवाड,देवदास चव्हाण, बाळासाहेब शांत,मनोहर मस्के,सुभाष पाटोळे, दिपक चव्हाण,दिलीप भोसले,अजित माने, सुनिल वाघमारे,सुनील चव्हाण,सागर चव्हाण,सचिन दुगाणे,सज्जन हताळे,मालोजी भोसले,हर्षवर्धन चव्हाण,अमिर नदाफ,अशोक भोसले,तुकाराम गडदे, उत्तम संकपाळ,विजय संकपाळ,दयानंद संकपाळ,श्रीकांत संकपाळ,रणजीत चव्हाण,विकास(गोटू शिंदे),विशाल पाटोळे,पोपट पाटोळे,संभाजी छत्रेनारायण छत्रे,अमित शांत,साहेबराव भोसले,

किसन चव्हाण,सतीश चव्हाण,अक्षय सरगर,रामराजे भोसले,गणपत पाटोळे,बापू माने,सुनील गायकवाड, प्रफुल्ल माने,गुलाब शिंदे,पोपट शिंदे,भानुदास गडदे,राजू चव्हाण,धिरज पाटील,वरदराज चव्हाण,अजित चव्हाण,अशोक चव्हाण,दिपक ‌कांबळे,प्रविण शिंदे,किरण कोळी,बसवराज दुगाने,किशोर पाटील,सचिन माळी,धनाजी चव्हाण, मोहन चव्हाण,सज्जन शिंदे,अमित उबाळे,विजय तेली, सुरज चव्हाण,प्रविण कुंभार,सुशांत कुंभार,ज्ञानेश्वर सवदे,संजय डांगे,साहिल बिराजदार,विक्रम शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार पडळकर यांना कॅबिनेट मंत्रीपद द्यावे 

गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून भाजप पक्षाचे काम करत असलेले विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना जत मधून विधानसभेचे आमदार होण्याची संधी जतच्या तमाम मतदारांनी दिली आहे.त्यांना तब्बल 38 हजार 500 इतके उच्चांकी मताधिक्य दिल्याने राज्यात त्यांच्या विजयाची दखल घेण्यात आली आहे.ग्रामीण भाग विकासाच्या कक्षेत आणण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर सारखे नेतृत्व मंत्रीपदी असणे गरजेचे आहे.त्याचबरोबर जत सारख्या दुष्काळी तालुक्याचा मंत्रीपदाचा दुष्काळ भाजपा नेतृत्वाने आमदार गोपीचंद पडळकर यांना मंत्रीपद देऊन संपवावा, अशी मागणी दिग्विजय चव्हाण यांनी केली.

विधानसभेतील विजयानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासमवेत दिग्विजय चव्हाण सोबत आकाराम मासाळ,अभिजीत चव्हाण आदी

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here