– महादेव हिंगमिरे : आमदार पडळकर यांना कैबिनेट मंत्री करून जतला न्याय द्यावा
जत : राज्याचे सर्वसमावेशक नेते असलेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजप नेतृत्वाने मुख्यमंत्री करावे,त्याचबरोबर जतमधून मोठा विजय संपादन करून विधानसभेचे आमदार झालेले गोपीचंद पडळकर यांना कैबिनेट मंत्रीपदी संधी द्यावी, अशी मागणी लिंगायत समाजाचे नेते महादेव हिंगमिरे यांनी केली आहे.
राज्यात भाजपच्या विजयाचा अगदी शांतपणे पाच वर्षे काम करत पाया रचणारे देवेंद्र फडवणीस हे राज्यातील फायरब्रँड नेते आहेत.राज्यात भाजपची सुसाट घोडदौड हे देवेंद्र फडणवीस यांच्या कष्टाचे फळ असून कोणतेही स्वच्छ प्रतिमा,निष्कलंक असणारे एकमेव नेते म्हणून फडणवीस यांची राज्यात ओळख आहे.महायुतीचे राज्यातील यश फडणवीस यांच्या नेतृत्वाचे फळ आहे.भाजपाला १३२ जागा मिळवून देत त्यांनी महाराष्ट्रात पक्षाला नंबर वन बनविले आहे.
त्यांच्या नेतृत्वात राज्य देशात अग्रेसर बनेल.त्यामुळे त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी भाजप नेतृत्वाने संधी द्यावी. त्याचबरोबर राज्याची मुलुख मैदानी तोफ असलेले आमचे नेते गोपीचंद पडळकर यांना जत तालुक्यातील दुष्काळी जनतेने विधानसभेवर आमदार म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून दिलेले आहे.जत तालुक्यात पाण्याचा दुष्काळ आता आमदार पडळकर हटवणार आहेतच.त्याचबरोबर तालुक्याचा कायम असणारा मंत्रीपदाचा दुष्काळ भाजप नेतृत्वाने आमदार पडळकर यांना कैबिनेट मंत्रिपद देऊन संपवून टाकावा,अशी मागणी महादेव हिंगमिरे यांनी केली आहे.