उपाशीपोटी थांबलेल्या विद्यार्थिनींना बसमध्ये घेण्यास नकार | वायफळे बस स्टँडवरील प्रकार

0
20

तासगाव : आटपाडी आगाराच्या ‘आटपाडी – इचलकरंजी’ (बस क्र. एम. एच. 20 बी. एल 1369) या बसच्या वाहकाचा मुजोरपणा चव्हाट्यावर आला आहे. वायफळे (ता. तासगाव) येथील स्टँडवर उपाशीपोटी बसची वाट पाहणाऱ्या चिमुरड्या विद्यार्थीनींसाठी या वाहकाने थांबवलेली बस पुढे न्यायला लावली.बसमध्ये उभे राहायला जागा असतानाही वाहकाने चालकाला बस थांबवू दिली नाही. याप्रकरणी नवले यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.बिरणवाडी (ता. तासगाव) येथील अनेक विद्यार्थी – विद्यार्थिनी वायफळे येथील बाळासाहेब देसाई हायस्कूल या शाळेत शिक्षण घेतात.

आज शनिवार असल्याने या विद्यार्थिनी सकाळी लवकर शाळेला आल्या होत्या. शाळा सुटल्यानंतर या विद्यार्थिनी वायफळे येथील बस स्टॉपवर बिरणवाडी या आपल्या गावी जाण्यासाठी थांबल्या होत्या. सकाळपासून या विद्यार्थिनी उपाशी होत्या. या विद्यार्थिनींना आटपाडी आगाराच्या बस शिवाय दुसरी कोणतीही बस नाही.त्यामुळे बसची वाट पाहत या विद्यार्थिनी स्टँडवर उभ्या होत्या.आटपाडी आगाराची ‘आटपाडी इचलकरंजी’ (बस क्र. एम. एच. 20 बी. एल 1369) ही बस सकाळी सव्वा अकरा वाजता वायफळे येथील स्टॉपवर आली.

या स्टॉप वर बिरणवाडी येथील 15 ते 20 विद्यार्थिनी सोबतच अन्य काही प्रवासी व तासगावला महाविद्यालयीन शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी उभे होते.विद्यार्थ्यांना पाहून चालकाने बस थांबवली. त्यावेळी बसमध्ये अवघे पाच ते सहा प्रवासी उभे होते. त्यामुळे वायफळे स्टॉपवर उभे असणारे सर्व विद्यार्थी व अन्य प्रवासी या बस मध्ये सहज बसू शकत होते. मात्र चालकाने थांबवलेली बस वाहकाने हलवायला लावली. बसमध्ये जागा असतानाही या वाहकाने थांबलेली बस तासगावच्या दिशेने नेण्याची सूचना चालकाला केली,त्यामुळे मुलींना पुढे तासभर बसची वाट पहावी लागली आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here