राज्यात अनेक दिवसापासून रखडलेल्या स्थानिक कार्यकर्त्यांचे बलस्थान असलेल्या नगरपालिका,महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवर व्हाव्यात,यासाठी काय करता येईल यासंदर्भात मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी वकिलांशी चर्चा करून सर्वोच्च न्यायालयालत अर्ली हिअरींगबाबत अर्ज करण्याच्या सूचना दिल्याच्या डी डी न्यूज या वृत्तवाहिनीला दिलेल्या पहिल्या मुलाखतीत सांगितले आहे.त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीचाही बार लवकरचं वाजण्याची शक्यता निर्माण जाली आहे..
सरकार कडून हालचाली सुरू झाल्याने स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये अडथळा ठरणाऱ्या न्यायालयीन स्थगिती (स्टे) उठवण्याचा प्रयत्न शासनाकडूनच सुरू आहे.
स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचा कार्यकाल संपुष्टात आल्यानंतर सर्व महापालिका आणि नगरपालिकांमध्ये प्रशासक नियुक्त असून अनेक महापालिकांमध्ये चार,चार वर्षांपासून प्रशासकाच्या हाती कारभार आहे.याबाबत प्रश्न विचारताच नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीडी न्यूज या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका न होणे योग्यच नाही.
याबाबत सर्वोच्य न्यायालयात प्रकरण प्रंलबित आहे. या निवडणुकांवर न्यायालयाचा स्टे उठवण्यासाठी सरकारी वकीलांशी चर्चा केली आहे.त्यांना अर्ली हिअरींगच्या सूचना देत या प्रकरणाची सुनावणी लवकर घेऊन त्यावरील न्यायालयीन स्थगिती उठवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.