जत : जत विधानसभा मतदारसंघातून दमदार विजय मिळविलेले लोकप्रिय नेते आ.गोपीचंद पडळकर यांना भाजपने मंत्रीमंडळात संधी द्यावी.सर्वांना सोबत घेवुन उपेक्षीतांचा आवाज बळकट करणारे धडाडीचे नेते म्हणून आ.पडळकर यांची ख्याती आहे त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद द्यावे, अशी मागणी लिंगायत समाजाचे नेते महादेव हिंगमिरे यांनी केली आहे.
हिंगमिरे म्हणाले,आटपाडी तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातून असामान्य कर्तृत्त्वाची चुणुक दाखविणारे नेते म्हणुन आमदार पडळकर यांची ख्याती आहे. प्रस्थापितांशी दोन हात करत उपेक्षीतांना सत्तेची कवाडे खुली करण्याचे काम त्यांनी केले. सर्व जाती-धर्मातील, समाजातील सवंगड्यांना सोबत घेवुन उपेक्षीतांना न्याय मिळवुन देण्याचे काम आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले.
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षाचा डोलारा वाढविण्याचे काम आमदार गोपीचंद पडळकर यांनी केल्याचे हिंगमिरे म्हणाले. आमदार पडळकर यांच्या नेतृत्त्वाखाली जत तालुक्यासह जिल्ह्यात आणि राज्यातही पक्षाला मोठा लाभ झाला आहे. शिवाय समाजातील सर्वांना सोबत घेवुन पक्षीय संघटन वाढविण्याचे कामही त्यांनी केले आहे.
विधान परिषदेचे आमदार म्हणुन त्यांनी केलेले काम लक्षवेधी आहे. जतमध्ये विकासाच्या भुमिकेवर पडळकर यांनी विधानसभा निवडणुकीत दैदिप्यमान विजय मिळविला. तेथील जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि अशक्य ते शक्य करणारे नेते म्हणुन पुन्हा एकदा पडळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचेही महादेव हिंगमिरे यांनी स्पष्ट केले. राज्यात मुख्यमंत्री म्हणुन देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्विकारला असुन भाजप आणि महायुती सरकारने सर्वसामान्यांचे प्रतिनिधीत्त्व करत जत, आटपाडी व जिल्ह्याच्या विकासाचा निर्धार केलेले पडळकर यांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी द्यावी, अशी मागणी महादेव हिंगमिरे यांनी केली.
राजकारणापेक्षा विकासाला चालना देणारे पडळकर मंत्री झाल्यास राज्यात आदर्शवत संदेश जाणार आहे. त्यांचे नाव मंत्रीपदासाठी अग्रभागी असून महायुती सरकार निश्चित पडळकर यांना मंत्रीपद दईल.असा विश्वास हिंगमिरे यांनी व्यक्त केला.