रविंद्र वस्त्रनिकेतनमधिल कपडे खरेदीबरोबच तीन ग्राहक बनले होंडा शाईनचे मालक

0
485

सलगरे : मिरज तालुक्यातील सलगरे येथील प्रसिद्ध आणि लोकप्रिय रविंद्र वस्त्रनिकेतनतर्फे दिवाळीच्या दरम्यान ग्राहकांसाठी राबविण्यात आलेल्या लकी ड्रॉ योजनेची सोडत दिनांक ४ डिसेंबर रोजी संपन्न झाली.दिवाळी दरम्यान खरेदी केलेल्या ग्राहकांना लकी ड्रॉ मधील विजेत्यांना दुचाकी,एलईडी टीव्ही, मिक्सर, कुकर यासह विविध भेटवस्तू लकी ड्रॉ च्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या यामध्ये प्रथम क्रमांकाच्या तीन होंडा शाईन या बाईकचे मानकरी मनिषा प्रकाश बाफळे बेळंकी,राहुल गवळी बामणी,भिमराव पाटील सांगोला

हे भाग्यवान विजेते ठरले.या विजेत्यांना होंडा शाईनचे वितरण ही करण्यात आले. याप्रसंगी शिरूरचे सद्गुरु कोंडीबा महाराज कवठेमहांकाळ महांकाली साखर कारखान्याच्या चेअरमन अनिता सगरे, तानाजी यमगर,रविंद्र वस्त्र निकेतनचे संचालक रविंद्र अथणे_राजेंद्र अथणे यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी द्वितीय क्रमांकाचे बक्षीस LED टि.व्ही. साठी तब्बल 23 भाग्यवान विजेत्यांची नावे लकी ड्रॉ च्या माध्यमातून घोषित करण्यात आली,तर

तृतीय क्रमांकासाठी 79 मिक्सर या गिफ्टच्या विजेत्यांची निवड व चतुर्थ क्रमांकासाठी 83 कुकर या गिफ्ट साठी भाग्यवान विजेते लकी ड्रॉच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले लकी ड्रॉच्या माध्यमातून बक्षिसांची मानकरी कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचल्याने लकी ड्रॉ च्या सुरुवातीपासूनच रविंद्र वस्त्र निकेतनच्या तासगांव जयसिंगपूर सांगोला विटा तुंग जत शिरोळ सावळज कोळे पलूस संख कडेगाव कवठे महांकाळ व कर्नाटकातील  रायबाग तेलसंग शिरूर येथील ग्राहकांनीही सलगरे येथील मुख्य शाखेत उपस्थिती दर्शवली होती.

तसेच परिसरातील अनेक ग्राहकांनी रविंद्र वस्त्र निकेतनच्या शाखेत उपस्थिती दर्शवली होती प्रत्येक मिनी स्टोअरच्या खरेदी केलेल्या ग्राहकांनी भाग्यवान विजेत्यांची नावे घोषित होत सर्वांचे लक्ष या लकी ड्रॉच्या घोषित होणाऱ्या नावाकडे लागून राहिले होते.या सर्व भाग्यवान विजेत्यांना बक्षीस वितरण ही त्या त्या रवींद्र वस्त्र निकेतनच्या शाखेच्या स्टोअर मधून वितरित करणार येणार असल्याचे यावेळी रविंद्र वस्त्र निकेतनच्या वतीने सांगण्यात आले.

फोटोओळी

रविंद्रच्या लकी ड्रॉ योजनेतील भाग्यवान विजेते काढण्यात आले,तर भाग्यवान होंडा शाईन विजेत्या ग्राहकांना गाडीचे वितरणही करण्यात आले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here