आमचा जन्म बिरोबामुळे आणि जीवन बाबासाहेबांच्या संविधानामुळे सुकर | गोपीचंद पडळकर यांनी महापुरुषां स्मरून घेतली आमदारकीची शपथ

0
219

जत : जत मतदार संघाचे भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज (ता.8) विधानभवनात आमदारकीची शपथ घेतली.विधानसभेचे अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी ही शपथ दिली. नव महाराष्ट्राकडे आशेने बघणाऱ्या सामान्य जनतेला साक्षी ठेवून आमदार गोपीचंद पडळकर यांनी ही शपथ घेतली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय ओबीसी समाजाचे मोठे नेते असलेले आमदार गोपीचंद पडळकर हे जत विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.मंत्रीपदासाठी सांभाव्य चेहरा म्हणून आमदार गोपीचंद पडळकर यांचे नाव चर्चेत आहे.सांगली जिल्ह्यात भाजपाचे तरूण व मोठा प्रभाव असलेले आमदार पडळकर यांच्याकडे पाहिले ‌जात आहे.जतचा मंत्रीपदाचा दुष्काळ आमदार पडळकर यांच्या माध्यमातून संपणार असे चित्र मतदार संघात आहे.

कॉग्रेसचे विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत यांना धूळ चारून त्यांनी विधानसभेत जोरदार मुसंडी मारली आहे. तरुण आमदार म्हणून आ.पडळकर यांच्याकडे पाहिले जात आहे.जत हा भाजपाचा बालेकिल्ला होता,मात्र गतवेळी कॉग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी कॉग्रेसचा मोठा विजय येथे मिळवला होता.यंदा विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना भाजपाचे येथे उतरवत मोठे चँलेज घेतले होते.अगदी चुरसीने झालेल्या या निवडणूकीत आमदार गोपीचंद पडळकर यांनी तब्बल ३८ हजार मतानी विजयी मिळवत विधानसभेत जोरदार इंट्री केली आहे.आज रवीवार दुसऱ्या दिवशी बहुतांशी आमदारांनी शपथ घेतली.

विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी सर्व नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली.जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही आपल्या आमदारकीची शपथ घेतली. नव महाराष्ट्राकडे आशेने पाहणाऱ्या सर्वसामान्य जनतेला साक्षी मानून त्यांनी आपल्या आमदारकीची शपथ घेतली.

कायम दुष्काळाचा डाग असलेल्या जत मतदार संघाला राज्यात नंबरवन बनविण्याची आश्वासन आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानसभा निवडणूकीपुर्वी जतच्या मतदारांना दिले आहे.ते पुर्ण करण्यासह जतचा चेहरामोहरा बदलण्याचे आवाहन आमदार पडळकर यांच्याकडे असणार आहे.

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, येत्या कालावधीत मतदारसंघातील विविध प्रश्नांवर काम करू. लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. मतदार संघातील प्रलंबित प्रश्न निपटून सामान्य जनतेने माझ्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवू.शपथविधीनंतर बोलताना आमदार पडळकर म्हणाले,आमचा जन्म बिरोबामुळे आहे आणि जीवन बाबासाहेबांच्या संविधानामुळे सुकर आहे.

आज विधानसभेत आमदारकीची शपथ घेतली. डोळ्यासमोर बसवेश्वरांनी भस्माच्या आडव्या पट्ट्यातून सांगितलेली समानता, अण्णाभाऊंच्या लेखणीतील क्रांती, बहुजन उद्धाराचा होळकरी इतिहास आहे. पुढची पाच वर्षे जनतेची अखंड सेवा करण्याचा निर्धार आहे. तुम्हा सर्वांच्या सहकार्याने विस्थापितांच्या उद्धाराचा नवा अध्याय पूर्णत्वास जाणार आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here