सांगली : सांगली जिल्हा ऑडिटर असोसिएशनचे अध्यक्ष सतीश विठ्ठल भोसले यांना ईगल फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय सामाजिक जिवनगौरव पुरस्कार संजय घोडावत युनिव्हर्सिटी कोल्हापूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
सांगली येथे सामाजिक, सहकार व कर सल्लागार क्षेत्रामध्ये अतुलनीय काम केल्याबद्दल व गेली वीस वर्ष जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे ऑडिट करून सहकारी संस्था आदर्श ठेवण्यात त्यांचे मोलाचे सहकार्य आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्यांना पुरस्कार मिळाल्यानंतर सांगली जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला.
डफळापूर सारख्या ग्रामीण भागातून येवून सांगली येथे सहकार हे कार्यक्षेत्र तयार करून सहकारी क्षेत्र टिकले पाहिजेत ग्रामीण भागातील संस्था वाढल्या पाहिजेत, शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे आहे हेतू ठेवून गेली वीस वर्ष सहकार व कर सल्लागार म्हणून मोलाचे कार्य केले आहे. ते महाराष्ट्रा राज्य ऑडिटर संघटनेचे सचिव, पब्लिक ट्रस्ट ऑडिटर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन ईगल फाउंडेशन व महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय सामाजिक जीवन गौरव पुरस्कार देऊन रविवारी कोल्हापूर येथे माजी खासदार निवेदिता माने, उद्योजक एन.सी.संघवी, संनदी लेखापाल डॉ.शंकर अंदानी, कराडचे नेते प्रविण काकडे,ईगल फौंडेशनचे अध्यक्ष विलासराव कोळेकर, सौ.शालन कोळेकर,उपजिल्हाधिकारी डॉक्टर संजय कुडेलकर, तहसीलदार सुशील बल्हेकर, कोल्हापूर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल उपाध्ये, ज्येष्ठ पत्रकार शिवराज काटकर, संजय घोडावत युनिव्हर्सिटी चे प्राचार्य सह मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सांगली जिल्हा ऑडिटर असोसिएशनचे अध्यक्ष सतीश भोसले यांना राज्यस्तरीय सामाजिक जिवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.