जत : जत विधानसभा मतदारसंघातून ३८ हजार मताधिक्याने निवडून आलेले आमदार गोपीचंद पडळकर यांना भाजपाने कॅबिनेट मंत्रीपद द्यावे व जत तालुक्यातील लिंगायत समाजाचे भाजपचे जेष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आरळी यांना विधान परिषदेचे आमदार करावे अशी मागणी भाजपा पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि भिवर्गीचे माजी सरपंच बसगोंडा चौगुले यांनी केली आहे.
बहुजन अल्पसंख्यांक उपेक्षित वंचितांचा आधार बनलेल्या आणि प्रस्थापितांविरोधात रोखठोकपणे आवाज करत कायमच अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या गोरगरिबांना न्याय मिळवून देणारे आणि शिक्षण, आरोग्य, एसटी कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर गावगाड्या पासून तांड्यापर्यंत सर्वच छोट्या- मोठ्या समाज घटकांसाठी कार्यरत राहणारे शेती व शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरची लढाई लढणारे, महाराष्ट्रातील तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेले बहुजन समाजाचे लोकनेते अशी ओळख निर्माण केलेले आमदार गोपीचंद पडळकर यांना महायुती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळावे अशी मागणी आहे.
आ. गोपीचंद पडळकर यांच्या विजयात मोलाची कामगिरी करणाऱ्या लिंगायत समाजाचे भाजपचे जेष्ठ नेते भाजपा वैद्यकीय आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी यांना विधान परिषद आमदार म्हणून नियुक्त करावे अशी मागणी होत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव जनसंपर्क आणि पक्षासाठी तळमळीने काम करण्याची जिद्द यामुळे डॉ. आरळी यांनी जिल्ह्यात आणि जत तालुक्यात मोठा जनसंपर्क तयार केला आहे.
गेली २५ वर्षाहून अधिक काळ भाजपा पक्षाशी प्रामाणिक राहुन पक्षाचे विचार जत तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये पोहोचविण्याचे काम डॉ रवींद्र आरळी यांनी प्रामाणिकपणे केले आहे. डॉ. आरळी हे भाजपा पक्षात शांत, संयमी व सुसंस्कृत नेते आहेत. त्यांनी वैद्यकीय सेवा, मेडिकल कॉलेज सांभाळत भाजपा पक्षाच्या माध्यमातून जत तालुक्यातील कार्यकर्त्यांची कामे करत सतत संपर्कात राहिले आहेत.
उमा चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. ट्रस्टच्या माध्यमातून तालुक्यात विद्यार्थी आणि समाजहिताची कामे केली आहेत. त्यामुळे त्यांना भाजपने निवडणूकीच्या प्रचारा दरम्यान एक मत दोन आमदार असे जाहीर केल्याप्रमाणे डॉ.रवींद्र आरळी यांना विधान परिषदेचे आमदार करावे अशी मागणी भिवर्गीचे माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच बसगोंडा चौगुले यांनी केली आहे. यावेळी सरपंच मदगोंडा सुसलाद, सोमनिंग बिरादार, भारत करे, अशोक वाघोली, नाना मेस्त्री आदी कार्यकर्ते उपस्थित