इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

0
102

अतिग्रे – संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या सीबीएसई बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांनी आय आय टी गुवाहाटी येथे आयोजित ‘इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल (IISF) 2024’ च्या आयडियाज फॉर विकसित भारत ” सायन्स अँड टेक्नॉलॉजी हॅकाथॉन” मध्ये राष्ट्रीय स्तरावर विजेतेपद मिळवले. इ 8 वीतील विद्यार्थी प्रियांशु गराई, दिगंबर मोहिते, चिराग यरगोप्पा यांनी “द रॉक इनोव्हेटर्स टीम” या नावाने राष्ट्रीय स्तरावर प्रोजेक्ट तयार केला होता. त्यांच्या अभिनव कल्पनेचे शीर्षक होते. “पल्स पायलट: नेक्स्ट-जेन ड्रायव्हर हेल्थ मॉनिटर”, गाडी चालवत असताना झोप लागत असल्यास किंवा मद्यप्राशनाखाली वाहन चालवणाऱ्या चालकांचे जीव वाचवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असे प्रोजेक्ट तयार केले होते.

या विद्यार्थ्यांच्या संघाने श्रेणी 1 इयत्ता 12वीपर्यंतच्या या गटात प्रथम क्रमांक पटकावला व ₹25,000/- (पंचवीस हजार रुपये) रोख बक्षीस मिळवले. या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाला भारतातील प्रमुख तज्ज्ञांचे विशेष कौतुक लाभले. इस्रोचे अध्यक्ष श्री. एस. सोमनाथ, डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत, सीएसआयआर-एनआयआयएसटीचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. के. व्ही. रमेश, संचालक डॉ. सी. आनंदरामकृष्णन, तसेच एएसटीईसी असमचे संचालक डॉ. जयदीप बरुआ यांनी संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाचे विशेष कौतुक केले.

या विद्यार्थ्यांना श्री. हर्षित सुकडेवे, डॉ. साबीर हुसेन, सौ. बीना इनामदार, उपप्राचार्या सौ. शोभा नवीन व प्राचार्य डॉ. नवीन एच. एम. यांचे मार्गदर्शन लाभले.

संस्थापक-अध्यक्ष श्री. संजय घोडावत यांनी विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व यशाचे जोरदार कौतुक केले. विश्वस्त श्री. विनायक भोसले यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तर संचालिका सस्मिता मोहंती यांनी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे राष्ट्रीय स्तरावर यश मिळवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here