जत : विधानसभा निवडणूक पुर्व दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आमदार गोपीचंद पडळकर हे जतच्या विकास योजनाबाबत अँक्शनमोडवर आले असून आज बुधवार जतच्या पुर्व भागातील ६५ गावांना वरदान ठरणाऱ्या म्हैसाळ विस्तारित योजनेच्या कार्यालयात आढावा बैठक घेत थेट सुरू कामांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना बरोबर घेत भेट देत कामाची गती वाढवण्याच्या सुचना दिल्या.
मल्लाळ,जत येथे म्हैसाळ बंदिस्त पाईपलाईन योजनेच्या कामाची पाहणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
येत्या उन्हाळ्यात या भागात पाणी पोहचवता येईल का या अनुषंगानेही त्यांनी प्रयत्न करावेत,असे आवाहनही अधिकाऱ्यांना केले आहे.
यावेळी जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी तसेच पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.