जत : जत महसूल विभाग आ.पडळकर यांच्या सध्या रडारवर असून तहसील कार्यालयात सुरू असलेले दलालराज,भष्ट्र कारभार याबाबत कडक निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.सामान्य लोकाची थेट कामे करण्यात यावीत,एकही दलाल कार्यालयात किंवा परिसरात दिसला नाही पाहिजे,अशा कडक सुचना आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रांताधिकारी व तहसीलदार यांना दिल्या आहेत.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज बुधवार जतच्या पुर्व भागातील ६५ गावांना वरदान ठरणाऱ्या म्हैसाळ विस्तारित योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.योजनाबाबत कसलीही अडचण असेलतर मला सांगा,कुठेही काम थांबले नाही पाहिजे,निधीचीही कमतरता भासू देणार नाही,असेही पडळकर यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.मल्लाळ,जत येथे म्हैसाळ बंदिस्त पाईपलाईन योजनेच्या कामाची पाहणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
जतच्या हाथ महत्वकांक्षी प्रकल्प आहे,राज्य शासनाकडून मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे.जत तालुक्यातील दुष्काळ हटविणार हे मी यापुर्वी सांगितले आहे.त्या दृष्टीने सर्व प्रकारे प्रयत्न सुरू आहेत.आज म्हैसाळ विस्तारितच्या कामाबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.त्याचबरोबर म्हैसाळ योजनेच्या अवर्तनाबाबतही सुचना देण्यात आल्या आहेत.
रब्बीची पिके ऐन बहरात आहेत.त्यांना पाणी वेळेत मिळावे,असे नियोजन करण्याचे निर्देशही आ.पडळकर यांनी दिले आहेत.यावेळी जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी तसेच पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
जत येथील विश्रामगृह येथे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जलसंपदा अधिकाऱ्या समवेत आढावा घेतला.