जत : महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री यल्लम्मा देवीची यात्रा येत्या २६ डिसेंबर ते ३० डिसेंबरअखेर भरणार आहे. जतची ग्रामदेवता, श्रीमंत डफळे राजघराण्याचे खासगी देवस्थान असलेल्या व नवसाला पावणारी देवी अशी मोठी ख्याती असलेल्या यल्लम्मा देवीची यात्रा ही दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात भरविण्यात येते. यावर्षी २६ डिसेंबर रोजी गंधोटीने यात्रेस प्रारंभ होणार आहे. २७ डिसेंबर रोजी श्री.यल्लम्मा देवीस महानैवेद्य तर, शनिवारी यल्लम्मा देवीची नगर पालखी प्रदक्षिणा व त्यानंतर किचचा कार्यक्रम होणार आहे.
यल्लम्मादेवी यात्रेत दुकान, हॉटेल, खानावळ, करमणुकीची साधने या जागा वाटप करण्यासाठी १४ व १७ डिसेंबर हे दोन दिवस नेमलेले आहेत.यल्लमादेवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दुलराजे डफळे, श्रीमंत ज्योस्नाराजे डफळे यांनी यात्रेकरिता नियोजन सुरू केले आहे. प्रतिष्ठानच्यावतीने यात्रेत येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी प्रतिष्ठानने महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र शौचालय बांधली आहेत तसेच प्रतिष्ठानच्यावतीने रेणुका मल्टीपर्पज हॉलची उभारणीही सुरू आहे.