सुधारित म्हैसाळच्या टप्पा क्रं १ च्या पंपहाऊसचा शुभारंभ

0
264

मिरज :  बेडग,मिरज येथे टप्पा क्रं.१ सुधारित म्हैसाळ योजनेच्या पंपहाऊसचा पायाभरणी शुभारंभ आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी मा.मंत्री सुरेश भाऊ खाडे,अधिक्षक अभियंता पाटोळे साहेब,कोरे साहेब,महादेव पाटील तसेच जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.जत तालुक्यासाठी वरदायिनी ठरणाऱ्या म्हैशाळ योजनेच्या बेडग-आरग रोड येथील नवीन बंदिस्त पाइपलाइन कामाचा शुभारंभ आ. गोपीचंद पडळकर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत केला.यामुळे पाणी पुरवठा व्यवस्थेत सुधारणा होऊन मिरज पूर्व भागातील नागरिकांना व विशेषतः जतकरांना मोठा लाभ होईल.

 

जत तालुका हा दुष्काळी आणि टंचाईग्रस्त भाग आहे.येथील गावांतील शेती आणि पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होऊन मुबलक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी महायुती शासन पूर्णक्षमतेने प्रयत्नशील आहे.या प्रयत्नशील वाटचालीचा आजचा टप्पा खूप महत्त्वपूर्ण असून रखडलेले काम पूर्णत्वास जाऊन जतकरांना हक्काचे पाणी सोयीस्कररित्या उपलब्ध होण्याचा मार्ग सुखकर होणार आहे. 

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here