विस्तारित म्हैसाळच्या बोगद्याची आ.गोपीचंद पडळकर यांनी केली पाहणी

0
362

जतच्या ६५ गावांना पाणी पोहचविणाऱ्या विस्तारित म्हैसाळ योजनेच्या बेळंखी ता.मिरज येथील बोगद्याची पाहणी जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.यावेळी अधिक्षक अभियंता पाटोळे साहेब,कार्यकारी अभिंयते रोहित कोरे,महादेव पाटील तसेच जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.कामाबाबत कसल्याही अडचणी आल्यातरी ‌त्या तातडीने सोडवाव्यात.जतला वेळेत पाणी पोहचविण्यासाठी जलसंपदाच्या ‌सर्व अधिकाऱ्यांनी कष्ट घ्यावे,त्यांच्या पाठिशी मी आहे.तेथे कमी तेथे मी आहे,असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले.

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले,जत तालुक्यातील शेवटच्या टोकापर्यत शेतकरी मागतील तेवढे पाणी उपलब्ध करून देण्याची माझी जबाबदारी आहे.अनेक दिवस जतच्या जनतेनी दुष्काळ सोसलाय,मात्र येत्या वर्षभरात जत तालुक्याचे चित्र बदलेले असेल,मी म्हटल्याप्रमाणे माझ्या मायभगीनीच्या हातातील ‌कोयता हटविणे याला माझे कायम प्राधान्य राहिल.

बेळंकी ता.मिरज येथील विस्तारित म्हैसाळ योजनेच्या बोगद्याची पाहणी करताना आमदार गोपीचंद पडळकर सोबत जलसंपदाचे अधिकारी

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here