बुमराह-आकाशदीपने शेवटच्या जोडीच्या भागीदारीचा नवा रचला विक्रम रचला

0
80

आस्ट्रेलियात सुरू असलेल्या गाबा कसोटीत जगातील सर्वश्रेष्ठ बॉलर असलेले जसप्रीत बुमराह आणि आकाशदीपच्या जोडीने बॅटिंगमध्येही कमाल केली आहे. २१ व्या शतकात याआधी कोणालाच करता आला नाही असा विक्रम त्यांनी केला आहे. बुमराह आणि आकाश यांनी चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यत १० व्या विकेटसाठी नाबाद ३९ धावांची भागीदारी केली.

ती आतापर्यतची सर्वश्रेष्ठ भागिदारी ठरली आहे.त्यांच्या या खेळीमुळे तिसरी कसोटी ड्रा होण्याची शक्यतेकडे वळली आहे.

याआधी गाबा कसोटीत भारतासाठी १० व्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी १९९१ मध्ये झाली होती. ही भागीदारी मनोज प्रभाकर आणि जवागल श्रीनाथ यांनी केली होती.

गाबा कसोटीत भारतासाठी १० व्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी ३३ धावांची होती. ही मनोज प्रभाकर आणि जवागल श्रीनाथ यांचीच होती.आता बुमराह आणि आकाशदीप यांनी नाबाद ३९ धावांची भागीदारी करत इतिहास रचला आहे.बुमराह आणि आकाश चौथ्या दिवशी खेळ समाप्त होताना नाबाद राहिले आहेत.

भारताचे झटपट विकेट पडल्याने असे वाटत होते की भारताला फॉलोऑन मिळेल. मात्र जसप्रीत बुमराह आणि आकाशदीप यांच्या शानदार भागीदारीमुळे संघाला फॉलोऑनपासून वाचता आले आहे.आज शेवटच्या दिवशी कसोटीचा निर्णायक दिवस आहे.

भारताचे ‌बॉलर असलेल्या या दोघांनी चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत १० व्या विकेटसाठी नाबाद ३९ धावांची भागीदारी केली.ही आता सर्वश्रेष्ठ खेळी ठरली असून आज सकाळी कितीवेळ आस्टोलियाचा मारा रोकतात हे बघावे लागेल.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here