– मोहन गायकवाड | आटपाडी येथे सुरक्षा आणि सुरक्षितता प्रशिक्षण संपन्न
सांगली : समग्र शिक्षा शिक्षण विभाग अंतर्गत सांगली जिल्ह्यातील 187 शाळेच्या केंद्र प्रमुखांना व मुख्याद्यापक सुरक्षा आणी सुरक्षितता प्रशिक्षण संपन्न झाले.दिनांक 12 डिसेंबरपासून राज्यात बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियमन 2009 ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. विद्यार्थ्याना सुरक्षित वातावरणात गुणवत्ता पूर्वक शिक्षण प्राप्त करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून शाळा आणी परत घरापर्यंत सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची गरज आहे.विद्यार्थ्यांवरील हिंसाचार, शाळा सुरक्षा, आपत्ती जोखीम कमी करणे, बाल संरक्षण, आरोग्य आणी स्वछता या विषयावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले.
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई, श्रीमती.आर.विमला मॅडम यांच्या सूचनेप्रमाणे व सांगली जिल्हा शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाने प्रशिक्षण राबविण्यात आल.सांगली जिल्ह्यातील तालुकास्तरावर प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं. यातील प्रशिक्षण आज सांगली येथे पार पडलं.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गट शिक्षण अधिकारी – जगन्नाथ बाबा कोळपे तसेच तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यानंतर गट शिक्षणाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.सहा तास प्रशिक्षण झाल्यानंतर सगळ्या प्रशिक्षणार्थींना सुरक्षा आणि सुरक्षितता पोस्टर किट वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांगली जिल्हा समन्वयक संतोष गोलांडे आणि तालुका समन्वयक नवनाथ चव्हाण यांनी प्रयत्न केले.