नागपूर अधिवेशनातील आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांची आज एन्ट्री हे खऱ्या अर्थाने गोरगरिबांच्या, वंचितांच्या आणि उपेक्षितांच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करणारे पाऊल आहे. त्यांचा ठाम आणि स्पष्टवक्ता स्वभाव हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे. समाजातील दुर्लक्षित आणि वंचित वर्गाच्या हितासाठी जे प्रखरतेने आवाज उठवतात, त्यांना लोक “गोरगरिबांचा मसिहा” म्हणून ओळखतात.
गोपीचंद पडळकर साहेबांचे काम पाहून खरोखरच गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाची आठवण होते. त्यांची कार्यशैली, लोकांशी असलेली जवळीक, आणि वंचितांसाठी असलेली लढाऊ भूमिका पाहता ते मुंडे साहेबांच्या विचारसरणीचे पुढे चालणारे खरे उत्तराधिकारी वाटतात. अशा नेत्यांची महाराष्ट्राला नितांत गरज आहे, जे केवळ भाषणातच नव्हे, तर कृतीतूनही समाजहितासाठी झटतात.