द्राक्षापासून तयार होणाऱ्या मनुक्याला कृषी उत्पादनाचा दर्जा देत वस्तू व सेवा करातून वगळण्याच्या महाराष्ट्राच्या मागणीला यश आले असून वस्तू सेवा कर परिषदेतमध्ये मनुका करमुक्त करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
वस्तू व सेवा कर परिषदेची ५५ वी बैठक दि. २१ आणि २२ डिसेंबर २०२४ रोजी जैसलमेर (राजस्थान) येथे आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेत देशभरातील सर्व राज्यांचे अर्थमंत्री, मंत्री सहभागी झाले आहेत. या परिषदेत महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधित्व मंत्री आदिती तटकरे करीत आहेत.