ग्रामीण भागातील विद्यार्थी वैज्ञानिक झाले पाहिजेत

0
182
  • आमदार गोपीचंद पडळकर

संख : संख ता.जत येथे 52 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन सन 2024-25 उत्साहात संपन्न झाले.या प्रदर्शनाचे उद्घाटन जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याहस्ते संपन्न झाले.विज्ञान प्रदर्शनास तालुक्यातील प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सहभागी झाल्या होत्या.

पंचायत समिती शिक्षण विभाग जत,जत तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ,श्री गुरु बसव विद्यामंदिर व जुनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने हे प्रदर्शन भरविण्यात आले होते.

यावेळी अध्यक्षस्थानी डॉ आर के पाटील तर प्रमुख उपस्थितीत डॉक्टर रवींद्र आरळी, संखच्या अप्पर तहसीलदार श्रीमती रोहिणी शंकरदास हे होते. 

या विज्ञान प्रदर्शनात घनकचरा व्यवस्थापन, सौरऊर्जा, पाणी निरजंतुकीरण,स्मार्ट सिटी,मॉडर्न स्कूल,नैसर्गिक शेती,पवन ऊर्जा स्वतः तयार उपकरणे विद्यार्थ्यांनी बनविली होती.त्याचे उपयोग व कसे हाताळायचे यांची माहिती उपस्थित मान्यवरांना विद्यार्थ्यांनी दिली.विज्ञान प्रदर्शनात जत,संख,उमदी,माडग्याळ,अंकलगी,बोर्गी,भिवर्गी,कोंतवबोलाद,बाज,अंकले,कुंभारी,शेगाव,दरीबडची, गुड्डापूर,आसंगी,कुलाळवाडी,उटगी आदी गावातील शाळांनी सहभाग घेतला.महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत तालुकास्तर उल्लास मेळावाचे तालुक्यातील सर्व केंद्राचे पोस्टर प्रदर्शन करण्यात आले.त्याचे उद्घाटन शिक्षणाधिकारी (योजना)जिल्हा परिषदेचे महेश धोत्रे यांनी केले.

यावेळी राजेसाहेब लोंढे (शिक्षण  अधिकारी),राम फरकांडे (गट शिक्षण अधिकारी जत),अन्सार शेख (विस्तार अधिकारी),किरण पाटील सर,आर.बी. पाटील सर,संजय तेली,सुभाष गोब्बी,विजय पाटील (भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष),अण्णासाहेब गडदे (माजी जि.प.अध्यक्ष),संतोष मस्के आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक राजेंद्र माने सर, सूत्रसंचालन चंद्रकांत कोळी सर यांनी केले.जत हायस्कूल जत,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राम फरकांडे, विस्तार अधिकारी अन्सर शेख,मुख्याध्यापिका सौ कविता किरण पाटील,तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघाचे सदस्य यांनी नियोजन केले.

संख येथे ५२ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार गोपीचंद पडळकर यांच्याहस्ते संपन्न झाले.यावेळी प्रदर्शानातील नववैज्ञानिकांनी बनविलेल्या उपकरणाची माहिती आमदार पडळकरसह मान्यवरांनी घेतली.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here