बार्शी तालुक्यातील भोयरे गावात दुहेरी हत्येची घटना घडली आहे. ज्यामुळे सोलापूर हादरून गेले आहे. शेताच्या वादातून युवक आणि आईचा मृत्यू झाला असून, वडील यात गंभीर जखमी झाले आहेत. सागर पाटील, सिंधू पाटील असे मृत व्यक्तीचे नाव असून, किसन पाटील असे गंभीर जखमी झालेल्या वडीलांचे नाव आहे.
या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून, हत्या झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बार्शी तालुक्यातील भोयरे गावात पाटील भावकीत वाद झाला. हा वाद शेतीच्या वाटेच्या वादातून झाल्याचे समजते. किसन पाटील, सागर पाटील आणि सिंधू पाटील हे कामानिमित्त शेतात गेले होते. शेतातून घराकडे परत येत असताना, त्यांच्या घरासमोर हल्ला घडला. पुतण्यानेच धारदार हत्याराने दोघांना ठार केले. यात किसन पाटील जखमी झाले.