डफळापूर : येथील श्रीपती शुगर अँण्ड पॅावर लि. डफळापूर येथील कारखाना साइट वरती दि.८ जानेवारी रोजी राज्याचे जेष्ठ नेते माजी मंत्री डॉ.पतंगराव कदम यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर श्री महेश जोशी म्हणाले डॉ.विश्वजीत कदम व महेंद्र आप्पा लाड यांचे मार्गदर्शनाखाली श्रीपती शुगरची स्थापना झाली असून डॉ.पतंगराव कदम साहेब यांनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात अस्तित्वात आले आहे. दुष्काळी भागासाठी साहेबांची असणारी तळमळ यातूनच श्रीपती शुगर ची स्थापना जत तालुक्यातील डफळापूर- कुड्नुर येथे केली आहे.
यावेळी शेती अधिकारी श्री. सतिश मिरजकर, एच.आर.मॅनेजर श्री. टरणजीत जाधव, चिफ इंजि श्री.यशवंत जाधव, चिफ केमिस्ट श्री.दिपक वाणी, इलेक्ट्रीकल इंजि श्री.आनंदा कदम, आय.टी. मॅनेजर श्री.माणिक पाटील, सिव्हिल इंजि श्री श्रीधर पाटील, असि. स्टोअर किपर श्री. शुभम कदम, सर्व अधिकारी उपस्थित होते.