सांगली : शहरातील एका पोलीस कर्मचाऱ्याने लग्नाचे आमिष दाखवून युवतीशी शारीरिक संबंध ठेवून तिचा गर्भपात केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
युवतीसमवेत लग्नास नकार देऊन तिला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या संशयित सोहेल इम्तियाज मुल्ला (पोलीस शिपाई, रा. भालदार गल्ली, खणभाग, सांगली) याच्याविरुद्ध सांगली शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
15 पिडीत युवतीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पीडित तरुणी ही कोल्हापूर जिल्ह्यात राहणारी आहे. संशयित सोहेल मुल्ला याने तिच्याशी ओळख करुन तिला लग्नाचे आमिष दाखवले. तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. ती गर्भवती असल्याचे समजताच संशयिताने तिला न सांगता गर्भपाताचे औषध दिले.
त्यानंतर त्याने तिला लग्नास नकार दिला. स्वतः आत्महत्या करण्याची, शारीरिक संबंधाचे फोटो व्हायरल करण्याची आणि जीवे मारण्याची त्याने तिला धमकी दिली. पीडित युवतीने त्याला दिलेले ७० हजार रुपये परत मागितले असताना त्याने शिवीगाळ केली.




