डफळापूर : येथील एसटी स्टँडचे अनेक दिवसापासून शेडच्या जागेवर अतिक्रमणे असल्याने मंजूरी मिळूनही काम रखडले होते.ग्रामपंचायतीने पोलिस बंदोबस्तात काही प्रमाणात अतिक्रमणे हटविल्याने बसस्थानक बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.आमदार व खासदार फंडातून यासाठी निधी उपलब्ध झाला आहे.५० बाय २० असे हे शेड होणार आहे.
जत तालुक्यातील महत्वाचे गाव असणारे डफळापूर येथील पुर्वीचे एसटी पिकअप शेडची दुरवास्था झाली होती.चारी बाजूनी खोकी धारकांनी अतिक्रमणे केल्याने शेडच गायब झाल्याची परिस्थिती होती.परिणामी प्रवाशी महिला,मुली शालेय विद्यार्थ्यांना रस्त्यावर उभे रहावे लागत होते.त्यामुळे नवे बसस्टँड बांधण्याची मागणी होती.आमदार व खासदार फंडातून निधीही मिळाला होता.मात्र अतिक्रमणे काढण्याचे मोठे काम ग्रामपंचायतीकडे होते.
सरपंच सुभाषराव गायकवाड यांनी हे शिवधनुष्य उचलत प्रांरभी खोकी धारकांना समजावून सांगून किंबहुना शुक्रवारी पोलीस बंदोबस्त घेत तब्बल ९ खोकी काढली,त्यापुढे असणाऱ्या खोकीधारकांनी गावातील सर्वच अतिक्रमणे काढून त्यानंतर आमचे काढा असा पवित्रा घेतल्याने अतिक्रम हटाव मोहिम थांबली आहे.दरम्यान आज सोमवारी ग्रामपंचायतीकडून गावातील सर्वच अतिक्रमण धारकांना २१ दिवसाच्या नोटीसा देण्यात येणार आहेत.त्यानंतर पुन्हा मोहिम राबविली जाणार आहे.मात्र सध्या एसटी पिकअप शेड बांधकाम सुरू होणार आहे.
डफळापूर स्टँड परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली.