जत : MSBTE मुंबई आंतर पदवीका अभियांत्रिकी क्रीडा संघटना यांच्या वतीने सर्व पॉलीटेकनिक कॉलेजसाठी प्रत्येक वर्षी क्रिडामहोत्सव आयोजित केला जातो.पुणे विभागाअंतर्गत B2 Zone Zonal स्पोर्ट्स स्पर्धेमध्ये सिद्धार्थ पॉलीटेकनिक जत मधील प्रथम वर्षातील अनिरुद्ध शिखरे याने लॉन्ग जॅम्प मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.
द्वितीय वर्ष इलेक्ट्रिकल विभागातील लक्ष्मीकांत चौगुले याने 400 मिटर रनिंग मध्ये द्वितीय क्रमांक तसेच तृतीय वर्ष मेकॅनिकल विभागातील करण राठोड याने 800 मिटर रनिंग मध्ये तृतीय क्रमांक पटकावत यश संपादन केले.संस्थेचे चेअरमन डॉ.वैशाली सनमडीकर,भारत साबळे,डॉ.कैलास सनमडीकर, प्राचार्या सौ.रेणुका वागोली,संजय बाबर,हरीश साळुंखे यांनी त्यांचे अभिनंदन केले.सिध्दार्थ पब्लिक स्कूलचे प्राचार्य के श्यामसुंदर,बस प्रमुख अमोल मराठे यांनीही सहकार्य केले.