जत : जत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एस.टी.पिकप शेड मोडकळीस आला असून प्रवाशांच्या जिवितास धोकादायक ठरणार असल्याने या ठिकाणी आमदार श्री.गोपिचंद पडळकर यांनी नविन एस.टी.पिकप शेडसाठी निधी उपलब्ध करावा अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते व शिवनगर व शिवनेरी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री.चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यांनी केली आहे.
जत येथील जत सांगली मार्गावरिल छत्रपती शिवाजीमहाराज चौकातील एस.टी.पीकप शेडची उभारणी करून खूप वर्षे होऊन गेली आहेत.सद्या हे पिकपशेड पूर्णपणे मोडकळीस आले असून धोकादायक झाले आहे.
जत सांगली मार्गावरिल सांगली मिरजेकडे जाणारे प्रवाशी अजूनही या मोडकळीस आलेल्या व धोकादायक अशा पिकप शेडचाच आसरा घेत आहेत.
सद्या या पिकप शेडच्या जिर्ण अवस्थेमुळे शहराच्या विद्रुपिकरणात भर पडली असून हे एस.टी.पिकप शेड हे प्रमुख व जत शहराचे नाक समजल्या जाणा-या छत्रपती शिवाजीमहाराज चौकात असल्याने या पिकप शेडमुळे चौकाचे विद्रुपीकरण झाले आहे.
तरी आमदार श्री.गोपिचंद पडळकर यांनी जत येथील छत्रपती शिवाजीमहाराज चौकात असलेल्या व मोडकळीस येऊन प्रवाशांसाठी जिवघेणे ठरणा-या एस.टी.पिकप शेडच्या जागेवर नविन सर्व सोइनेयुक्त असे पिकप शेडसाठी भरिव निधी उपलब्ध करून देउन हे पिकपशेडचे काम मार्गी लावावे व प्रवाशांचा जिव वाचवावा असेही कुंभार म्हणाले.