शासकीय इमारतीसमोरील खोकीधारकांसाठी दुकानगाळे बांधून द्यावेत

0
145

जत : इस्लामपूर-चडचण या राष्ट्रीय महामार्गावरील नविन प्रशासकिय इमारतीसमोरील अनधिकृत अतिक्रमित खोकीधारकांसाठी जि.प.कडील जागेत दहा बाय दहा ची बीओटी तत्वावर दुकानगाळे बांधून द्यावेत अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया आठवले गटाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव संजय कांबळे यांनी जि.प.च्या मुख्यकार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे केली आहे. 

   

जत येथील नविन प्रशासकिय इमारतीसमोरील चडचण-इस्लामपूर या  राष्ट्रीय महामार्ग मोठ्या प्रमाणात वाहतुक सुरू असून शाळा,हायस्कूल, महाविद्यालय, न्यायालय, विविध शासकिय कार्यालय यामुळे हा रस्ता नेहमी वर्दळीचा झाला आहे.

 

या रस्त्यावरच विविध व्यवसाईकांनी अतिक्रमण करून खोकी टाकली आहेत.यामध्ये एका एका मालकाची तीन तीन खोकी असून या पैकी खोकी भाड्याने देण्याचा प्रतापही या खोकीधारकांकडून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

 

या रस्त्यावरील ही अनधिकृत अतिक्रमित खोकी वाहतूकीस अडथळा निर्माण करित असून एसआरव्हीएम हायस्कूल मधिल विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेत या रस्त्यावरून जा ये करणे धोक्याचे झाल्याने जतचे तहसीलदार प्रविण धानोरकर यांनी जत नगरपरिषद, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कोल्हापूर, जत पोलीस स्टेशन, महावितरण कंपनी आदींना सदरची अतिक्रमणे काढण्यासाठी लेखी आदेशही दिले आहेत. 

परंतु जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांची या सर्व अनधिकृत अतिक्रमण धारक खोकी मालकांनी भेट घेतल्याने आमदार पडळकर यांनी रस्त्यावर जी अतिक्रमणे आहेत ती सर्व बेकायदेशीर असून ती शेवटी काढावीच लागणार असल्याचे सांगून जि.प.कडील जागेवर या अतिक्रमीत खोकीधारकांचे लवकरच पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करू, असेही आमदार पडळकर यांनी सांगितले आहे.

जत येथील नविन प्रशासकिय इमारतीसमोरील जी अनधिकृत अतिक्रमित खोकीधारक आहेत त्या सर्व खोकीधारकांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करून त्यांना अधिकृत व कायदेशीर मान्यतेने त्यांचे जि.प.जागेत पुनर्वसन करण्यासाठी आमदार पडळकर यांनी योग्य ते नियोजन करावे असेही कांबळे म्हणाले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here