राजे रामराव महाविद्यालयात पारंपारिक दिन उत्साहात

0
276

*जत : येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टीने पारंपारिक वेशभूषा दिन व विविध गुणदर्शन सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

         

या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील, वार्षिक पारितोषिक वितरण स्नेहसंमेलनाचे कार्याध्यक्ष प्रा.सुरेश बामणे यांच्या हस्ते संपन्न झाले. तर उपप्राचार्य प्रा.महादेव करेन्नवर, अंतर्गत हमी कक्षाचे समन्वयक डॉ.शिवाजी कुलाल, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.सतिशकुमार पडोळकर, डॉ.प्रकाश सज्जन, प्रा.कृष्णा रानगर यांच्या उपस्थितीत पार पडले.

             

यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करून पारंपारिक दिन साजरा केला. यामध्ये कोळी पेहराव, केरळी पेहराव, आदिवासी पेहराव, दक्षिण भारतीय पेहराव, धनगरी पेहराव, वारकरी पेहराव, शिवकालीन पेहराव अशा विविध वेशभूषांचा समावेश होता. तर यावेळी संपन्न झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये एकपात्री अभिनय, उत्कृष्ट वेशभूषा, समूह नृत्य, वैयक्तिक नृत्य, गीत गायन, लघु नाटक, लावण्या व वेगवेगळ्या प्रकारचे गीते,  यावर मुला- मुलींनी सुंदर डान्स करुन उपस्थित विद्यार्थ्यांना ताल धरायला लावला.स्वागत व प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.सतिशकुमार पडोळकर,सूत्रसंचालन डॉ.ज्ञानेश्वर कांबळे व प्राध्यापिका रेश्मा लवटे यांनी केले. तर आभार ज्युनिअर विभागाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.रवींद्र काळे यांनी व्यक्त केले. 

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here