गटार बांधकामाच्या नावाखाली जत नगरपरिषद व ठेकेदार यांच्याकडून नागरिकांच्या जिवाशी खेळ,खोदलेल्या गटारीचे काम लवकरात लवकर केले नाहीतर नगरपरिषदेसमोर बोंबाबोब आंदोलन करण्याचा आर.पी.आय.चा ईशारा.दिला आहे.
जत नगरपरिषदेने जत शहरातील प्रभाग क्रमांक ८ व प्रभाग क्रमांक ५ मध्ये सार्वजनिक गटारीचे काम सुरू केले आहे. हे काम करण्यासाठी त्यांनी जे.सी.बी.ने खोल चरही काढली आहे.परंतु ही गटारीसाठी चर काढताना जो कचरा काढला आहे.तो कचरा रस्त्यावरच टाकण्यात आला आहे.तसेच या गटारीच्या कामासाठी म्हणून जी खडी व इतर बांधकाम साहीत्य टाकण्यात आले आहे त्यामुळे हा नदाफ गल्लीतून शिवनगर व जत हायस्कूलकडे जाणारा रस्ता वाहतूकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे.त्यामुळे या परिसरातील रहिवाशांची व या रस्त्यावरून नेहमी ये जा करणा-या वाहनचालकांची मोठी अडचण व गैसरसोय झाली आहे.
हे काम सुरू करित असताना सबंधित ठेकेदार यांनी कामासंदर्भात माहीती फलक न लावल्याने हे काम कोणत्या स्वरूपाचे आहे हे समजत नाही.त्याचप्रमाणे काम चालू असलेतरी काम चालू असलेचा माहीती फलक न लावल्याने अपघाताचीही शक्यता आहे.
असाच प्रकार जत नगरपरिषद व सबंधित ठेकेदार यानी प्रभाग क्रमांक ५ मधिल छत्रपती संभाजीमहाराज चौक ते जैनाळकर दुकान येथपर्यंत करण्यात आला असून या ठिकाणी ही गटारीचे काम करण्यासाठी म्हणून सबंधित ठेकेदाराने जे.सी.बी.च्या सहाय्याने चर काढून चर काढताना जो कचरा निघाला आहे तो रस्त्यावरच टाकल्याने व हे गटारीचे काम मुख्य रस्त्याला लागून असल्याने व अद्याप हे काम सुरू न झाल्याने या ठिकाणी मोठ्याप्रमाणात वारंवार वाहतूकीची कोंडी होऊन याचा त्रास वाहनचालकांबरोबरच या परिसरातील रहिवाशांना ही होत आहे.
जत नगरपरिषदेकडील ही दोन्ही गटारीची कामे नगरपरिषद व सबंधित ठेकेदार यांनी लवकरात लवकर केली नाहीत तर जत नगरपरिषदेसमोर बोंबाबोंब आंदोलन करण्याचा ईशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया ( आ ) गटाचे पश्चिम महाराष्ट्र सहसचिव संजय कांबळे,जिल्हाउपाध्यक्ष विकास साबळे,तालुकाध्यक्ष संजय कांबळे ( पाटील ) यांनी दिला आहे.