विटा : उदगिरी शुगर अँन्ड पॉवर लि. चे संस्थापक आणि भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम सर यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा अत्यंत मानाचा जीवनसाधना गौरव पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.
विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्य दरवर्षी विविध क्षेत्रात समग्र कार्यकाळात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींना जीवनसाधना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. अतिशय प्रतिष्ठीत पुरस्कारासाठी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, कृषी, विज्ञान तंत्रज्ञान, उद्योग, सहकार, पर्यावरण, कला इत्यादी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीची जीवनसाधना पुरस्कारासाठी निवड करणेत येते. हा पुरस्कार सोमवार दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी विद्यापीठाच्या 76 व्या वर्धापन दिन सोहळ्यात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या उपस्थित प्रदान करण्यात येणार आहे.
सावित्रीबाई फुले विद्यापीठातील विद्यार्थी, संशोधक, प्रशासक म्हणून 30 वर्षाहून अधिक काळ सर्वथा संस्मरणीय व समाधानकारक असा आहे. विद्यापीठाचा हा मानाचा पुरस्कार म्हणजे डॉ. शिवाजीराव कदम सर यांनी आजवर केलेल्या शैक्षणिक, संशोधनात्मक, संस्थात्मक आणि सामाजिक कार्याची पावती आहे. या पुरस्काराबद्दल बोलताना सरांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठाची सर्व अधिकार मंडळावर मला काम करता आले. विद्यापीठाची विकासाची वाटचाल मला जवळून पाहता आली.
या नामवंत विद्यापीठाचा जगभर नावलौकिक आहे. शैक्षणिक क्षेत्रात मी अनेक वर्षापासून काम करीत असून विद्यापीठाकडून दिल्या जाणाऱ्या या जीवनसाधना गौरव पुरस्कारासाठी माझी निवड झाल्याचे मला समजले. हा पुरस्कार मी आदरपूर्वक स्वीकारणार असल्याची सदभावना त्यांनी व्यक्त केली. डॉ. कदम सर हे सुसंस्कृत व उतुंग व्यतिमत्व असून त्यांना मिळालेल्या पुरस्कार बद्दल सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी आनंद व्यक्त केला आहे.