राज्यातील युवा प्रशिक्षणार्थींचा बुधवारी सांगलीत महामेळावा★ हभप तुकाराम बाबा महाराज यांची माहिती

0
5

जत : विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत लाखाहून जास्त प्रशिक्षणार्थी राज्यातील विविध कार्यालयात नेमले. सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थी यांना कामावरून कमी केले जात आहे. राज्यातील सर्व प्रशिक्षणार्थीवर पुन्हा बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. या युवा प्रशिक्षणार्थी यांना न्याय मिळावा यासाठी मुंबईमध्ये मोर्चा काढण्यात आला. याच मागणीसाठी व आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी सांगलीतील काँग्रेस भवनच्या मागील बाजूस असलेल्या आझाद व्यायाम मंडळ मैदानावर सकाळी दहा वाजता बुधवारी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तथा महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख हभप तुकाराम बाबा महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

तुकाराम बाबा म्हणाले, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही योजना राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणात सुरु केली आहे. या प्रशिक्षणा अंतर्गत सर्व प्रशिक्षणार्थी यांची पंचायत समिती कार्यालय, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र विभागामध्ये ऑपरेटर, ए.एस.एम नर्स पदावर काम करत आहेत. या योजनामुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी मिळाली आहे. सहा महिन्याचे प्रशिक्षणा पूर्ण केल्यानतर इच्छुक उमेदवार ज्या ठिकाणी काम करत असतील त्याना तिथेच कायमस्वरूपी नौकरी, रोजगार मिळेत असे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. पण अद्याप याबाबत शासनाने अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

या तरुणावर पुन्हा नौकरी शोधण्याची वेळ आली आहे.
या प्रशिक्षणार्थी न्याय द्यावा, प्रशिक्षणानंतर कायम रोजगार देण्यात यावा, विद्या वेतनमध्ये वाढ करण्यात यावी, विद्यावेतन नियमीत व वेळेवर देण्यात यावी, युवा प्रशिक्षरार्थीना शासकीय सेवेत १०% आरक्षण देण्यात यावे, शासकीय कर्मचारी प्रमाणे रजा अनुज्ञेय असावी यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात आला. १० हजाराहून अधिक तरुण मोर्चात सहभागी झाले होते. शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने या प्रशिक्षणार्थीच्या मागण्यांसाठी आंदोलनाची दिशा ठरवणे म्हत्वाचे आहे. त्या अनुषंगाने पश्चिम महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थीचा महामेळावा सांगलीत आयोजित करण्यात आला आहे. महामेळाव्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे तुकाराम बाबा महाराज यांनी संगितले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here